Arjun-Malaika Engagement: मलायका-अर्जुनचं ठरलं! पॅरिसमध्ये होणार साखरपुडा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun-Malaika Engagement

Arjun-Malaika Engagement: मलायका-अर्जुनचं ठरलं! पॅरिसमध्ये होणार साखरपुडा?

बॉलिवूड मधील लव्ह बर्डस म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोराला बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांनी त्यांचं नातं काही दिवस जगापासून लपवून ठेवले होते मात्र काहीकाळानंतर त्यांनी हे मान्य केलं. अर्जुन कपूरने आणि मलायका अरोराला कौटुंबिक कार्यक्रमात आणि पार्टीत ते एकत्र दिसू लागले आणि त्यानंतर दोघांच्या कुटुंबानेही त्यांच नातं स्वीकारलं असल्याचं सांगितल गेलं.

अर्जुन-मलायकाच्या अफेअरनंतर चाहते त्यांच्या लग्नाची बातमी ऐकण्यासाठी उत्सूक होते. हे दोघे लग्नासाठी तयार आहेत अशा बऱ्याच बातम्या आल्या मात्र त्या अफवा होत्या. पुन्हा एकदा अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या लग्नाची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे आणि असे सांगण्यात येत आहे की हे दोघे पुढच्या आठवड्यात साखरपुडा करू शकतात.

ट्रेड एक्सपर्ट उमेर संधू यांने त्याच्या एका ट्विटद्वारे ट्विट केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडली आहे. उमीर संधूने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, अर्जुन-मलायका पुढील आठवड्यात एंगेजमेंट करू शकतात. उमेर संधूच्या ट्विटमध्ये लिहिलयं की , 'बॉलिवुडमधून मोठे ब्रेकिंग समोर आले आहे, त्यानुसार मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये एंगेजमेंट करू शकतात.'

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दोघांनी 2019 मध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. हे दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसले. अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. बी-टाऊनच्या या जोडप्याला लग्नाबाबतही अनेकदा प्रश्न विचारण्यात आले. आता ही बातमी समोर आल्यानंतर मलायका आणि अर्जुनचे चाहते चांगलेच खूश आहेत.

टॅग्स :Arjun Kapoormalaika arora