कोव्हिडमुक्त झाल्यावरअर्जुन कपूरने मलायकासाठी केलं हे सॉल्लिड काम ..Malaika Arora | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor,Malaika Arora

कोव्हिडमुक्त झाल्यावरअर्जुन कपूरने मलायकासाठी केलं हे सॉल्लिड काम

मलायका अरोरा(Malaika Arora) अरबाज खानपासून विभक्त झाली आणि काही दिवसांनीच तिचं नाव अर्जुन कपूर(Arjun Kapoor)सोबत जोडलं गेलं. तेव्हा अरबाज-मलायकाचा घटस्फोट होण्यामागे अरबाजचं करिअरमध्ये अयशस्वी असणं,भाऊ सलमानवर अवलंबून राहणं मलायकाला पटत नव्हतं अशी अनेक कारण समोर आली तर एकावेळी चक्क अर्जुन सोबतच्या तिच्या वाढत्या जवळीकमुळे खान कुटुंबियांनी अरबाजला तिला डिच्चू द्यायला सांगितला या कारणाचाही बोलबाला झाला. असो आता नेमकं काय कारण असेल यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. कारण आता मलायका-अर्जुनच्या नात्यालाही काही वर्ष झालीयत अनं ते टिकून आहे. दोघं अनेक ठिकाणी एकत्र दिसतात तसंच सुख-दुःखाच्या प्रसंगात एकमेकांसोबत उभे राहिलेले आपण पाहिलेयत. सो,त्यांचं नातं सध्यातरी लांबवर चालेल असं दिसतंय.

पण यांच्या नात्याला अनेकांच्या दुस्वासाला सामोरं जावं लागलंय, अद्यापही त्याचा सामना करावा लागतोय. त्याचं एक कारण एकदम स्ट्रॉंग आहे ते म्हणजे दोघांच्या वयात असलेलं १२ वर्षांचं अंतर. अर्जुन आहे ३६ वर्षांचा तर मलायका आहे ४८ वर्षांची. त्यामुळे अनेकदा मलायकाला ट्रोलर्सच्या घाणेरड्या कमेंट्सचा सामना करावा लागतो. आतापर्यंत या दोघांनीही या ट्रोलर्सला फार मनावर घेतलं नव्हतं. पण आता मात्र अर्जुननं मलायकासाठी कायपण म्हणत ट्रोलर्सला मी महत्तव देत नाही. माझ्या आयुष्यात मी काय करायचं हे इतरांनी सांगू नये,ते मी ठरवेन. जे आम्हाला बोलतात, तेच आम्ही दिसलो की सेल्फि काढायला आमच्या मागे मागे धावतात. अशांच्या ट्रोलिंगला का मनावर घ्यायचं. त्यांना मी एवढंच सांगेन,तुम्हीही आयुष्य जगा,आम्हालाही जगू द्या. मलायकासाठी अर्जुननं ट्रोलर्सला धारेवर धरलं याचं मात्र त्याच्या अनेक चाहत्यांनी कौतूक केलंय. कोरोनातनं बरं झाल्यावर एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपलं मत मांडलंय.

हेही वाचा: हॉलीवूडमध्ये दीपिकाच्या हिंदीच्या क्लासला मोठा डिमांड;पहा झलक...

अर्जुननं नवीन वर्षाचं स्वागत करताना त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मलायकासोबतचा छान रोमॅंटिक फोटोही शेअर केला होता. अर्जुन कपूर आता आपल्याला मोहित सुरीच्या 'एक व्हिलन रीटर्न्स' या सिनेमात दिसणार आहे. त्याच्यासोबत जॉन अब्राहम,तारा सुतारिया,दिशा पटानीही आपल्याला दिसणार आहेत. तसंच तो आपल्याला विशाल भारद्वाजचा मुलगा आस्मान भारद्वाजच्या 'कुत्ते' या सिनेमात दिसणार आहे. त्या सिनेमात त्याच्यासोबत तब्बू,नसिरुद्दिन शहा,राधिका मदन,कोंकणासेन शर्माही काम करीत आहेत .

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top