Arjun Kapoor: मलायका गरोदर आहे का? हे विचारताच अर्जुनची सटकली.. म्हणाला, तपासल्याशिवाय.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Kapoor reacts to false news about Malaika Arora's pregnancy

Arjun Kapoor: मलायका गरोदर आहे का? हे विचारताच अर्जुनची सटकली.. म्हणाला, तपासल्याशिवाय..

Arjun Kapoor and malaika arora: आपल्या वैयक्तिक आयुषयामुळे कायम चर्चेत राहणारी बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचे अफेअर सर्वांना ठाऊक आहेच. 2017 मध्ये मलायकान अरबाज खान सोबत घटस्फोट घेतला, तेव्हापासून ते एकत्र आहेत.

नुकताच मलायकानं अर्जुन कपूरचा न्यूड फोटो शेयर केला होता. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्याला अजून एक दिवस उलटत नाही तोवर आता मलायकाच्या गरोदर असण्याची बातमी चर्चेत आली आहे.

विशेष म्हणजे या बातमीवर अर्जुन कपूरमात्रा चांगलाव्ह भडकला आहे. त्यावेळी त्यांनी अत्यंत कठोर शब्दात त्यांच्या नात्यावर बोलणाऱ्यांचा समाचार घेतला.

(Arjun Kapoor reacts to false news about Malaika Arora's pregnancy)

मलायका (malaika arora) अरोरा गरोदर असल्याची अफवा मध्यंतरी पसरली होती, ही बातमी ऐकताच अर्जुन चांगलाच भडकला होता. याच घटनेचा उल्लेख नुकत्याच त्याने दिलेल्या मुलाखतीत पुन्हा केला गेला. यावेळी त्याचा रंग अनावर होयन त्याने सडेतोड उत्तर दिले आहे.

अर्जुन कपूर म्हणाला, 'आमच्या नात्याविषयी सगळेच उघड आहे. परंतु मीडियाचा त्यात नाहक हस्तक्षेप होत आहे. मीडियाने अशा बातम्या करू नये त्याचा आमच्या वैयक्तिक आयुष्यावर गंभीर परिणाम होईल.'

'चुकीची माहिती पसरवून सहज लोकांचे लक्ष वेधून घेता येते, जे काम काही लोक करत आहेत. मला माहिती आहे की, कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य कधीच वैयक्तिक नसते आणि याची जाणीव ठेवूनच आम्ही कायम आनंदी राहात असतो.'

पुढे अर्जुन म्हणाला, 'प्रेक्षकांपर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्यासाठी सेलिब्रिटी मीडियाची मदत घेत असतात. त्यामुळे माध्यमांनी ही आम्हाला समजून घ्यायला हवे. मिडियाने वस्तुस्थिती तपासल्याशिवाय कोणत्याही गोष्टी लिहू नये.'

'आम्हीसुद्धा माणूसच आहोत याची जाणीव ठेवा. एखाद्याबद्दल आपण एखादी गोष्टी लिहिणार असू तेव्हा ती वेळोवेळी तपासली पाहिजे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत कधीच मीडियापासून काहीही लपवले नाही. आम्ही मिडियावर विश्वास ठेवतो, पण त्याचे गंभीर परिणाम आम्हाला भोगायला लागतात.' अशा शब्दात त्याने आपली नाराजी व्यक्त केली.