'माझे वडिल चूक की बरोबर नाही माहिती'? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bony and arjun kapoor

'माझे वडिल चूक की बरोबर नाही माहिती'?

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor ) यानं आता एका मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे तो सोशल मीडिय़ावर चर्चेत आला आहे. तो आणि त्याची आई मोना शौरी यांचे घनिष्ठ नाते सर्वांना माहिती आहे. नऊ वर्षांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. मात्र अद्यापही अर्जून आईविषयीच्या आठवणींना उजाळा देत असतो. जेव्हा त्याचे वडिल बोनी कपूर (boney kapoor ) आणि श्रीदेवी (sridevi ) यांचे अफेअर सुरु झाले त्यावेळी त्यांच्या कौटूंबिक आयुष्यात वाद निर्माण होऊ लागला. बोनी कपूर विवाहित होते तरीही त्यांचे आणि श्रीदेवीमधील प्रेमसंबंध लपून राहिले नाहीत. (arjun kapoor reveals he is not okay with boney kapoor and sridevi affair )

श्रीदेवी (sridevi ) आणि अर्जुन कपूर (boney kapoor ) यांच्यात शेवटपर्यत वाद होते. त्यांनी त्याचा स्वीकार काही केला नाही. त्यांच्या निधनानंतर त्यानं आपल्या वडिलांना आणि परिवाराला सांभाळून घेतले. जेव्हा श्रीदेवीचे निधन झाले त्यानंतर बोनी कपूर आणि अर्जुन कपूर यांच्यात जवळीकता वाढली. आता त्यांच्यात सगळे आलबेल आहे. फिल्म कम्पॅनियनशी बोलताना याविषयी अर्जुननं सांगितलं की, त्यावेळी माझी मानसिकता काही ठीक नव्हती. माझ्या आईनं जो माझा सांभाळ केला तो माझ्या मनात होता. तसं होणं स्वाभाविक आहे.

हेही वाचा: सुशांतच्या आत्महत्येची माहिती खरी, विकीपिडियाचा दावा

हेही वाचा: Video : पोस्टरला दुग्धाभिषेक करताना पाहून सोनू सूद म्हणाला..

सामान्यपणे आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात. त्यांना सामोरं जाताना आपल्याला खंबीर व्हावं लागतं. मी ही झालो. कारण मला माझ्या करिअरकडे लक्ष द्यायचे होते. ज्यावेळी तुम्ही कुणावर प्रेम करु लागता तेव्हा पुन्हा एकदा ती व्यक्ती तुम्हाला आवडू लागते. माझ्या वडिलांनी काय केले, ते चूक होते की बरोबर हे काही मी सांगू शकत नाही. माझ्यासाठी ते चांगलं नव्हत. मुलगा या नात्यानं त्यांच्या त्या नात्याचा परिणाम माझ्यावर झाला होता. असंही अर्जुननं यावेळी सांगितले.

loading image
go to top