सुशांतनं आत्महत्या केली, आमची माहिती खरी, विकीपिडियाचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor sushant singh rajput

सुशांतच्या आत्महत्येची माहिती खरी, विकीपिडियाचा दावा

मुंबई - बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput ) निधनाला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. प्रसारमाध्य़मांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं आत्महत्या केली होती. त्यानं असं टोकाचं पाऊल का उचललं याविषयी विश्वसनीय माहिती समोर आलेली नाही. पोलिस त्या प्रकरणाचा शोध घेत आहे. सध्या सोशल मीडियावर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात जो उल्लेख केला आहे त्यामुळे त्याच्या फॅन्समध्ये नाराजी पसरली आहे. (Sushant Singh Rajput Fans Asked Wikipedia Jimmy Wales Not To List Him In Suicidal Death )

जेव्हा सुशांतच्या आत्महत्येची बातमी बॉलीवू़डमध्ये पसरली तेव्हा संपूर्ण बॉलीवू़डवर शोककळा पसरली होती. अनेकांनी त्याला आदरांजली वाहिली होती. सीबीआयकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता. अजूनही सुशांतचे फॅन्स विकीपिडियावर त्याच्या आत्महत्येचा जो उल्लेख झाला त्यावरुन आवाज उठवताना दिसत आहेत. त्याचे झाले असे की, विकीपिडियावर त्याच्या मृत्यचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा राग त्याच्या फॅन्सला आला आहे. त्यांनी यावर नाराजी व्यक्त करुन संबंधितांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे विकीपि़डिया ट्रेंड होताना दिसत आहे. (Wikipedia Sushant Was Killed)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंगची आत्महत्या झाली असा उल्लेख काढून टाकावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. काहींनी यावर कमेंट केली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, विकीपिडियावर जो उल्लेख आहे त्यात अपूर्ण माहिती देण्यात आली आहे. कारण त्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. सीबीआय याप्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करायचा अशी मागणी त्याच्या फॅन्सनं केली होती. पाटणा येथे राहणा-या सुशांत सिंगच्या प्रकरणात बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनाही हस्तक्षेप करावा लागला होता.

हेही वाचा: इथे प्रत्येकालाच 'हॉट' अभिनेत्री हवी असते- प्राची देसाई

हेही वाचा: Video : पोस्टरला दुग्धाभिषेक करताना पाहून सोनू सूद म्हणाला..

विकीपिडियाचे संस्थापक जिमी वेल्स (Jimmy Wales) याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, आम्ही आमच्या सुत्रांकडून संदर्भ तपासून घेतले आहे. आम्ही व्टिटरवरुन काही माहिती घेतलेली नाही. जे कॅम्पेन चालले होते त्यातून कुठलेही नित्कर्ष काढण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top