अर्जुन इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळतोय, गर्लफ्रेंड करतेय 'चिअर अप'

बॉलीवूडमधील (bollywood) प्रसिद्ध हिरो अर्जुन रामपाल (arjun rampal) हा त्याच्या हटकेपणासाठी प्रख्यात आहे.
arjun rampal
arjun rampal Team esakal

मुंबई - बॉलीवूडमधील (bollywood) प्रसिद्ध हिरो अर्जुन रामपाल (arjun rampal) हा त्याच्या हटकेपणासाठी प्रख्यात आहे. तो नेहमी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) शेयर करत असतो. आताही त्याचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. त्यात तो इंग्ल़डमध्ये क्रिकेट (england cricket) खेळताना दिसतो आहे. त्यात त्यानं क्रिकेट युनिफॉर्मही घातला आहे. हातात ग्लोव्हज घातले आहेत. पायाला पॅडही लावले आहेत. त्या फोटोंमध्येही आपण पाहू शकतो की, त्या रॉक स्टारसाठी गेम ऑन आहे. असे दिसुन येते. काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपाल हा एका वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. तो आणि वाद हे तसे जुनेच समीकरण आहे.

अर्जुननं आपले इंग्लडमधील ते फोटो शेयर करताना त्यावर कमेंटही लिहिली आहे. त्या फोटोंविषयी त्यानं लिहिलं आहे की, चार्टर हाऊस, सरे आणि क्रिकेट त्या फोटोंमध्ये त्याची गर्लफ्रेंड ग्रॅबिएला डेमेटियड्सही दिसून येत आहे. अर्जुन रामपालच्या त्या फोटोंना सोशल मीडियावरुनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स दिल्या आहेत. अर्जुनच्या गर्लफ्रेंडनं देखील ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तिनं लिहिलं आहे की, गेम डे.

सध्या अर्जुन हा खास सुट्टयांसाठी इंग्लंडला गेला आहे. त्याच्या समवेत त्याची मैत्रीणही आहे.त्याचं काय आहे अर्जुन हा त्याच्या बुडापेस्टमध्ये सुरु असणाऱ्या एका चित्रपटाच्या शुटमध्ये बिझी होता. त्यावेळी त्यानं त्याविषयी असं लिहिलं आहे की, सेटवर परतल्यानं मला बरं वाटत आहे. माझं सर्व काही चांगलं चाललं आहे.

48 वर्षांचा अर्जुन रामपाल हा आता लवकरच कंगणाच्या धाकड या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. असं म्हटलं जातं की, त्यासाठी त्यानं नवीन लुक केला आहे. याशिवाय तो द पेंटहाऊस, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव मुळे चर्चेत आहे. करिअरच्या सुरुवातीला मॉडेलिंग करणारा अर्जुननं आपल्या करिअरची सुरुवात अशोक मेहता यांच्या मोक्ष पासून केली होती. त्यानंतर त्याचा इश्क प्यार और मोहब्बत नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com