अर्णव यांना जामीन मिळाला,कंगणा नाचली:व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana dance

आपल्या वक्तव्यावरुन कायम वादाच्या भोव-यात असणा-या कंगणाने अर्णव यांच्या सुटकेचं समर्थन केलं आहे. त्याचा आनंद तिने साजरा केला आहे.  

अर्णव यांना जामीन मिळाला,कंगणा नाचली:व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या प्रकारे आपला आनंद व्यक्त केला आहे. यात काही बॉलीवूड सेलिब्रेटींचाही समावेश आहे.

आपल्या वक्तव्यावरुन कायम वादाच्या भोव-यात असणा-या कंगणाने अर्णव यांच्या सुटकेचं समर्थन केलं आहे. त्याचा आनंद तिने साजरा केला आहे. दुसरीकडे  ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही इज बॅक, जय हो असे म्हटलं आहे. 

अर्णव यांना जामीन मिळताच कंगणाने एक सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्याला तिच्या चाहत्यांनी पसंती दिली आहे. अनेकांनी त्यावर टीका केली आहे. आपल्या व्टिटमध्ये कंगणा म्हणते, अर्णब यांच्या सुटकेचा माझ्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे, यासाठी तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत तो आनंद सर्वांसोबत शेयर केला आहे. 

हे ही वाचा: मान गये बॉस.. सिनेमातून केलं बाहेर पण एका सीनसाठी घेतले तब्बल ७४ कोटी    

अर्णब यांच्या अटकेनंतर कंगनाने महाराष्ट्र सरकावरही टीका केली होती.  अर्णब यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही सूड भावनेतूनच केली गेली असल्याचे तिने म्हटले आहे.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं  दिलासा दिला आहे. गोस्वामी यांना न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. त्यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

गोस्वामी यांच्यासोबतच प्रकरणातल्या आणखी दोन आरोपींनादेखील जामीन मंजूर झाला आहे.  कंगनाने शेअर केलेल्या व्हिडिओत आवो जी पधारो मारो देश.. या गाण्यावर नृत्य केलं आहे. उदयपूरमध्ये कंगनाच्या भावाचं अक्षतचा लग्नसोहळा होत आहे. लग्नापूर्वीचे हळदी, संगीत, मेहंदी असे सोहळे रंगत आहेत. यात कंगणाने डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगणा बेधुंद होऊन नाचताना दिसत आहे.

राजस्थानच्या पारंपरिक गाण्यावर कंगणा व रंगोली थिरकत आहेत. कंगणा आतापर्यंत या सोहळ्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने भाई की शादी हे कॅप्शन दिल्याचं पाहायला मिळत आहे.

loading image
go to top