#Arrest swara bhaskar; 'तालिबानी आणि हिंदूत्ववादी सारखेच'

आपल्या परखड स्वभावासाठी बॉलीवूडमधील bollywood काही अभिनेत्री actress या प्रसिद्ध आहेत
#Arrest swara bhaskar; 'तालिबानी आणि हिंदूत्ववादी सारखेच'
Updated on

आपल्या परखड स्वभावासाठी बॉलीवूडमधील bollywood काही अभिनेत्री actress या प्रसिद्ध आहेत. एखाद्या गोष्टीवर त्या प्रतिक्रिया देताना कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. आपल्या जे योग्य वाटते ते बोलून त्याविषयी भावना व्यक्त करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये सर्वात वरचा क्रमांक अर्थात बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतचा kangana ranaut आहे. तिच्यानंतर स्वरा भास्कर swara bhaskar आणि तापसी पन्नु taapse pannu या देखील आपल्या परखड प्रतिक्रियेविषयी प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर त्या सतत अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रेटी आहेत. त्यांच्या त्या प्रतिक्रियांचे पडसादही सोशल मीडियावर वेगानं उमटताना दिसतात. जसं की आता सध्या स्वरा भास्करच्या एका व्टिटनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामध्ये तिनं तालिबानी आणि हिंदूत्ववाद्यांची तुलना केली आहे.

स्वरानं आपल्या व्टिटमध्ये म्हटले आहे की, आपण हिंदूत्ववाद्यांच्या दहशतवादासमोर टिकाव धरु शकणार नाही. आणि आता आपण तालिबान्यांच्या आक्रमणामुळे चिंताग्रस्त झालो आहोत. आपल्याला त्यामुळे मोठा धक्काही बसला आहे. यात आणखी एक महत्वाची बाब सांगायची झाल्यास आपण तालिबानचा तो आतंक पाहून शांतही बसु शकत नाही. आणि दुसरीकडे आपण हिंदूत्ववाद्यांच्या आतंकवादाविषयी बोलतो. अशाप्रकारे विचार सध्या आपण करतो आहोत. या प्रतिक्रियेनं स्वरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे ती अनेकांच्या टीकेचाही विषय झाली आहे. एका युझरनं तातडीनं स्वरावर आयपीसीच्या २९५ अ या कलमान्वये गुन्हा दाखल करावा. अशी मागणी केली आहे. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी स्वरावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वरा चर्चेत आली आहे. करिना कपूरनं आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवले. त्यावरुन तिला जेव्हा ट्रोल करण्यात आले तेव्हा तिच्या समर्थनार्थ स्वरानं व्टिट केलं होतं. जे कोणी करिनाला नावं ठेवत आहेत ते गाढव आहेत. अशा प्रकारची टिप्पणी स्वरानं केली होती. आता तिनं चक्क तालिबानी आणि हिंदूत्ववाद्यांची तुलना केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जगाच्या पाठीवर एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे तालिबानी, त्यांनी बळकावलेला अफगाणिस्तान आणि त्यांचा दहशतवाद. त्यावरुन आतापर्यत बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र यासगळ्यात वादग्रस्त प्रतिक्रिया स्वरानं दिल्याची चर्चा आहे. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com