कला दिग्दर्शक राजू सापतेंची आत्महत्या, युनियन पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या
Raju Sapte
Raju Sapte file image

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली. सापते यांचा ताथवडे येथील लूक्स सोसायटीत फ्लॅट आहे. शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ते फ्लॅटवर होते. रात्री त्यांनी व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांना फोन लावत होत्या . मात्र, ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे पत्नीने ताथवडे येथे धाव घेतली असता शनिवारी (ता. ३) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास सुरू आहे. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्रास दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी या व्हिडीओमध्ये केला. आत्महत्या करण्यापूर्वी राजू यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी आत्महत्या करण्याचे कारणदेखील सांगितले होते. (Art director Raju Sapte suicide, serious allegations against union officer)

व्हिडिओमध्ये राजू यांनी सांगितले, 'मी आता कुठल्याही प्रकारची नशा केली नाही. मी पूर्ण विचाराने हा निर्णय घेत आहे. मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. लेबर युनियनचे राकेश मौर्या हे मला खूप त्रास देत आहेत. माझं कोणत्याही प्रकारचे पेमेंट त्यांच्याकडे थकीत नाही. सगळे पेमेंट मी दिलेले आहेत. माझे कोणतेही पैसे बाकी नाहीत. पण राकेश मौर्या यांनी युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून हे वदवून घेत आहेत, की राजू सापतेंनी पैसे दिले नाही. नरेश मेस्सी यांनी मी कोणतेही पेमेंट आत्तापर्यंत बाकी ठेवलेले नाही असे राकेश यांना सांगितले. तरी देखील ते मला त्रास देत आहते. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. त्यातील एक प्रोजेक्ट मला त्यांच्यामुळे सोडावे लागले. कारण ते मला काम करू देत नाहीत. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.'

Raju Sapte
‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक लीलाधर सावंत आर्थिक संकटात

तुक्या तुकविला नाग्या नाचविला, हुतूतू , दोन घडीचा डाव, राजधानी एक्स्प्रेस, मन्या द वंडर बॉय या चित्रपटांचे आणि आंबट गोड या मालिकेचे कला दिग्दर्शन राजू यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com