esakal | सोशल मीडियावर डॅडींच्या नातीची चर्चा; फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

सोशल मीडियावर डॅडींच्या नातीची चर्चा; फोटो व्हायरल

सोशल मीडियावर डॅडींच्या नातीची चर्चा; फोटो व्हायरल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता अक्षय वाघमारे Akshay Waghamare आणि योगिता गवळी Yogita Gawli यांच्या घरी मे महिन्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. गेल्या वर्षी ८ मे रोजी लॉकडाउनमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. योगताने ७ मे २०२१ रोजी मुलीला जन्म दिला. योगिता ही अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची Arun Gawli (डॅडी) मुलगी आहे. आता आजोबा अरुण गवळींसोबत नातीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अक्षय वाघमारेने इन्स्टाग्रामवर आजोबा-नातीच्या भेटीचे हे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

आजी-आजोबांसोबतचे तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधीही अक्षयने डॅडींसोबतचा चिमुकलीचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये अरुण गवळी नातीला त्यांच्या मांडीवर घेऊन तिच्याकडे पाहून हसत असल्याचं दिसत आहे. नातीला भेटण्याचा एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. 'आयुष्यभराची आठवण आणि अनुभव', अशी कमेंट योगिताने या फोटोवर केली आहे.

हेही वाचा: अमृता फडणवीस यांची 'गणेश वंदना'; पहा व्हिडीओ

अक्षय आणि योगिताने त्यांच्या मुलीचं नाव 'अर्णा' असं ठेवलं आहे. १४ जून रोजी अक्षयने मुलीचं नाव जाहीर केलं. 'मला इतका आनंद झाला आहे की मी तो शब्दांत मांडू शकत नाही. आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच ही गोड बातमी मिळाली. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला', अशा शब्दांत अक्षयने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. दगडी चाळीतच योगिता आणि अक्षयचं लग्न पार पडलं होतं. २०१९ मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता.

loading image
go to top