esakal | अरुण गवळीच्या जावईचा चित्रपट; 'खुर्ची'साठी राजकारणात होणारे डावपेच लवकरच प्रेक्षकांसमोर
sakal

बोलून बातमी शोधा

akshay waghmare

‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईनसह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवित आहे.

अरुण गवळीच्या जावईचा चित्रपट; 'खुर्ची'साठी राजकारणात होणारे डावपेच लवकरच प्रेक्षकांसमोर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन

सत्ता हा शब्दच राजकारण सुरू होण्यास कारणीभूत आहे. राजकारणात मिळणाऱ्या सत्तेचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. हेच राजकारण आपल्याला हल्ली चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला मिळत आहे. सत्तेमधील महत्वाचा भाग म्हणजे खुर्ची. खुर्चीसाठी होणाऱ्या राजकारणाची झलक प्रेक्षकांनी याआधी ‘सामना’, ‘सिंहासन’ आणि ‘धुरळा’सारख्या चित्रपटांमधून पाहिली. सत्तेच्या अभावी जाऊन सत्तेसाठी काहीही करणाऱ्या राजकारण्यांच्या वागणुकीमुळे सामान्य कुटुंबांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पहायला मिळाले. मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या आगामी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 

या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये खुर्चीसाठी करण्यात आलेली लढाई उघडपणे पाहायला मिळत आहे. ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईनसह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवित आहे. या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री श्रेया पसलकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही  चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

हेही वाचा : अभिनेत्री तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित हा चित्रपट खेड्यापाड्यातल्या लहान मुलांपर्यंत पोहोचलेल्या राजकारणाचे चित्रण  दर्शविणारा आहे. गावागावातल्या खुर्चीसाठीच्या राजकारणात लहान मुलांच्या मनावर बिंबत जाणारे राजकारणाचे डावपेच ‘खुर्ची’ सिनेमातून दिग्दर्शकाने उत्तमरीत्या मांडले आहे. ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलू ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.
 

loading image