Arun Govil News : रामानंद सागर यांचा राम आधुनिक रामायणात दिसणार 'या' भूमिकेत ? अरुण गोविलांचे 'कमबॅक'

गेल्या काही दिवसांपासून नितेश तिवारी (Nitesh Tiwari Ramayan Movie) यांच्या रामायणावर आधारित चित्रपटाची चर्चा रंगली आहे.
Arun Govil Ramayan Movie
Arun Govil Ramayan Movie esakal

Arun Govil in Nitesh Tiwari Movie: प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी काळात येणाऱ्या रामायणावर आधारित चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर हा श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बिग बी अमिताभ बच्चन यांचीही खास भूमिका आहे. खरं तर याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आली नसली तरी त्यातील कलाकारांच्या निवडीबाबत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगलेली दिसते आहे.

टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या मालिकेनं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती त्या रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेची क्रेझ अजुनही आहे. त्यामध्ये अभिनेते अरुण गोविल यांनी रामाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्या त्या भूमिकेची जोरदार चर्चा होती. त्यावरुन त्यांच्या लोकप्रियतेतही कमालीची वाढ झाली होती. आता त्यांच्याविषयी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

अमिताभ बच्चन हे रामायण या चित्रपटामध्ये राजा दशरथाची भूमिका साकारणार अशा चर्चांना उधाण आले होते. आता तिवारी यांच्या रामायणावर आधारित चित्रपटासाठी अरुण गोविल यांच्याशी बातचीत सुरु असल्याची माहिती आहे. मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश तिवारी यांच्या रामायणावर आधारित चित्रपटामध्ये अरुण गोविल यांचाही सहभाग असणार असल्याचे बोलले जात आहे. अर्थात याविषयी कोणत्याही प्रकारचा करार झाला नसला तरी यात बिग बी अमिताभ बच्चन की अरुण गोविल यापैकी कुणाची त्या भूमिकेसाठी निवड होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Arun Govil Ramayan Movie
Jaya Prada News : 'जया प्रदा यांना अटक करुन कोर्टासमोर हजर करा'! अभिनेत्रीची डोकेदुखी वाढणार?

नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासुन चर्चा सुरु आहे. त्यात सुरुवातीला सीतेच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीचे नाव चर्चेत होते. मात्र ते नाव आता मागे पडले आहे. त्या ऐवजी जान्हवी कपूरचे नाव समोर आले आहे. तसेच कैकयीच्या भूमिकेसाठी लारा दत्ताचे नाव घेतले जात असून बॉबी देओल कुंभकर्णची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे.

Arun Govil Ramayan Movie
Kangana Ranaut: 'जर का मला...' राजकारणात येण्यावर कंगनानं दिली मोठी प्रतिक्रिया!

या सगळ्या नावांची जोरदार चर्चा आहे.त्यापैकी कोणती नावं दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याकडून फिक्स केली जातात याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com