coronavirus: उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांनी शाहरुख खानचे मानले आभार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

अभिनेता शाहरुख खानने कोरोना व्हायरसच्या संकटासोबत लढण्यासाठी वेगवेगळ्या त-हेने मदत करणार असल्याची नुकतीच घोषणा केली. त्याच्या या घोषणेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे..

मुंबई- अभिनेता शाहरुख खानने कोरोना व्हायरसच्या संकटासोबत लढण्यासाठी वेगवेगळ्या त-हेने मदत करणार असल्याची नुकतीच घोषणा केली. शाहरुखने त्याच्या आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स, रेज चिलीज एंटरटेन्मेंट, रेड चिलीज विएफएक्स या कंपनींमार्फत तसंच त्याची एनजीओ मीर फाऊंडेशनमार्फत सध्या कोलकाता, दिल्ली आणि मुंबईला मदत करण्याची घोषणा केली.त्याच्या या घोषणेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे..

coronavirus: हृतिक रोशन म्हणाला, 'कोरोना व्हायरसने माझ्या वडिलांना घाबरलं पाहिजे'

शाहरुखने मुलभूत गोष्टींसाठी वंचित असणा-या लोकांना घरपोच एक महिना जेवण पोहोचवणे, ऍसिड अटॅक झालेल्या महिलांना एक महिना स्टायपेंड दिले जाणार अशा ब-याच गोष्टींचा  समावेश करत ही मदत जाहीर केली आहे...सोबतंच 'पीएम केअर्स फंड' आणि 'महाराष्ट्र चीफ मिनिस्टर फंड'साठी देखील रक्कम जाहीर न करता मदत केली आहे..

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहरुख खान व त्याची पत्नी गौरी खानचे आभार मानणारं ट्टीट केलं आहे..

उद्धव ठाकरे यांनी इंग्रजीमध्ये आभार मानले असले तरी शाहरुख खानने मात्र त्यांना मराठीत प्रतिक्रिया देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे..

शाहरुखनने ट्वीट करत म्हटलंय, 'ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंब तळे साचे..सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल. आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद.. आपणं सगळे एक कुटुंब आहोत..आणि आपण एकमेकांना सुदृढ ठेवण्यासाठी एकत्र असणं गरजेचं आहे' असं शाहरुखने लिहिलंय..

तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शाहरुखचे आभार मानत, 'धन्यवाद शाहरुख खान जी..या कठीण काळात तुमचं हे योगदान कित्येकांच्या आयुष्याला स्पर्श करणार आहे..' असं ट्वीटमध्ये म्हटलंय..

यावर शाहरुखने प्रतिक्रिया देत म्हटलंय, 'सर, तुम्ही तर दिल्लीवाले आहात, धन्यवाद नका करु, आदेश द्या..आपल्या दिल्लीतील भाऊ-बहिणींसाठी मी कार्यरत असेन..देवाची इच्छा असेल तर आपण लवकरंच या संकटावर मात करत यातून बाहेर पडू..'

शाहरुख खानने देशातील संकटाच्या काळात गरजुंना मदत करुन संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत चाहत्यांच्या मनात देखील जागा निर्माण केली आहे..

arvind kejriwal and uddhav thackeray react shah rukh khans announcement  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arvind kejriwal and uddhav thackeray react shah rukh khans announcement