'आर्याच्या पोटात दोन लीटर दारु; त्यामुळे आला अ‍ॅटॅक ' 

aarya bannerji sucide or murder doctar said due to overdose of alcohol
aarya bannerji sucide or murder doctar said due to overdose of alcohol

मुंबई - डर्टी पिक्चर मध्ये काम करुन प्रसिध्दीस आलेल्या अभिनेत्री आर्या बॅनर्जीचा संशयास्पद मृत्यु तिच्या घरात झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. तिनं आत्महत्या केली की हा घातपात होता यावरुन चर्चेला सुरुवात झाली होती. त्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पोस्ट व्हायरल झाल्या. अखेर त्यावर डॉक्टरांनी शक्यता वर्तवली असून यामुळे आणखी काही गोष्टी प्रकाशात येणार आहे.

आर्या बॅनर्जी हिचा मृत्यु ही नेमका कशानं झाला याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. शुक्रवारी तिचा मृतदेह आढळून आला होता. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठिवण्यात आला होता. त्याच्यानंतर अंदाज व्यक्त करता येईल असे सांगण्यात आले होते. त्या अहवालावर डॉक्टरांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, आर्याचा खून झाला आहे असे प्रथमदर्शनी तर वाटत नाही. मात्र तिच्या शरिरात दारुचा मोठा अंश आढळून आला आहे. या कारणास्तव तिला कार्डिअॅक अॅटक आला असावा असे वाटते. पोलिसांना तिच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये जावे लागले होते. 

ज्यावेळी पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला तेव्हा त्या अहवालावरुन काही धागेदोरे हाती येतील अशी आशा पोलिसांना होती. मात्र डॉक्टरांनी सांगितलेला अंदाज यामुळे तपासातून आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपासाविषयी पोलिसांनी सांगितले की, डॉक्टरांनी आर्याचा खून झाला आहे या गोष्टीला चूकीचे ठरवले आहे. त्यांनी आर्याच्या रक्तात दारुचा अंश सापडल्याचे सांगितले. दारुचे अतिसेवन यामुळे तिला कार्डिएक अॅटॅक आल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी ती मदत मागण्यासाठी गेली असताना ती पडली असेल त्यात तिचा मृत्यु झाल्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी सांगितले, आर्याच्या जवळ जे रक्त सांडले होते ते ती पडल्यामुळे.  तिच्या पोटातून तब्बल दोन लीटर दारु मिळाली आहे. यामुळे तिची शुध्द हपरली असेल आणि त्यात तिचा तोल जाऊन पडल्याने हा प्रकार घडला असावा. 

पोलिसांनाही आर्याच्या घरातून दारुच्या बाटल्या आणि रक्ताने माखलेले टिश्यु जप्त केले आहेत. 33 वर्षीय आर्याच्या मृत्युचे कारण हे तिनं दारुचा घेतलेला अतिरिक्त डोस ही कारणे समोर आली आहेत. आर्यानं लव सेक्स और धोका या चित्रपटात काम केले होते. ती प्रसिध्द बंगाली सतार वादक निखिल बंदोपाध्याय यांची मुलगी होती. 
  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com