Sirf Ek Bandaa Kaafi Hai: 'आमची बदनामी...', मनोज वाजपेयीच्या चित्रपटाला आसाराम बापू ट्रस्टनं पाठवली नोटीस

Sirf Ek Bandaa Kaafi Hai
Sirf Ek Bandaa Kaafi HaiEsakal

अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित आणि अभिनेता मनोज बाजपेयी याचा आगामी चित्रपट 'सिर्फ एक बंदा काफी है' ट्रेलर रिलीज झाला आहे. 23 मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटावरुन वाद सुरु झाला आहे. OTT वर प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचं वर्णन सत्य घटनेने प्रेरित ओरीजनल चित्रपट असल्याच सांगितलं जात आहे.

Sirf Ek Bandaa Kaafi Hai
Vivek Agnihotri: 'भाजपचं चित्रपटांसाठी पैसे पुरवतो' ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावर अग्निहोत्री संतापले..पाठवली नोटीस...

'सिर्फ एक बंदा काफी है' हा एक कोर्टरूम ड्रामा चित्रपट आहे. मात्र आता हाच चित्रपट कायद्याच्या कचाट्यात अडकलेला दिसत आहे. आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा 'बापू'ची कथा असल्याचं सांगितलं आहे.

मनोज बाजपेयी या चित्रपटात एका वकिलाच्या भूमिकेत आहे. तो पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीची केस लढत आहे. जीच्यावर एका भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा एक खटला मनोज एकट्याने लढत असतांना येणाऱ्या अडचणी आणि त्याची या प्रकरणात दोषीला शिक्षा मिळवुन देण्यासाठी चाललेली धडपड सर्वच मन हेलावुन टाकणार आहे.

Sirf Ek Bandaa Kaafi Hai
Adipurush trailer Twitter review: रामाचा बाण सुटला, हनुमाननं गदा आपटली रावणाची लंका हलली! आदिपुरुषचा कडक ट्रेलर

या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या चित्रपटातील गॉडमॅन दुसरा कोणी नसून आसाराम बापू आहे. असा अंदाज लावण्यात आला कारण मनोज पीसी सोलंकी याची भूमिका साकारत आहे. पीसी सोलंकी तोच वकील आहे ज्याने आसाराम विरुद्ध खटला लढवला आणि त्याला तुरुंगात पाठवले.

दरम्यान, आता आसाराम बापूच्या चॅरिटेबल ट्रस्टने मंगळवारी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये चित्रपटाच्या प्रमोशन आणि रिलीजवर बंदी घालण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

Sirf Ek Bandaa Kaafi Hai
Adipurush Dialogue: हे आहेत आदिपुरुषचे टॉप डायलॉग..ऐकून श्रीरामाचं स्मरण अन् अंगात स्फुरण संचारलंच पाहिजे..

नोटीस जारी करताना वकिलाने सांगतिले आहे की, हा चित्रपट आक्षेपार्ह आणि त्याच्या क्लायंटची बदनामी करणारा आहे आणि त्यामुळे त्याची प्रतिष्ठा खराब होऊ शकते. तसेच त्यांच्या भक्तांच्या आणि अनुयायांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

प्रॅक्टिकल प्रोडक्शनच्या बॅनरखाली 'सिर्फ एक बंदा काफी है'ची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते आसिफ शेख यांनी नोटीस मिळाल्याची पुष्टी केली आहे ते म्हणाले की, "होय, आम्हाला नोटीस मिळाली आहे आणि आमचे वकील पुढचं काम करतील".

Sirf Ek Bandaa Kaafi Hai
Adipurush Saif Ali Khan Look: 'आम्हाला रामापेक्षा रावणच आवडला!' सैफच्या लूकची पडली भुरळ

त्यांनी सांगतिलं की, "आम्ही पीसी सोलंकी यांच्यावर बायोपिक बनवला आहे आणि हा चित्रपट बनवण्याचे अधिकार मी त्यांच्याकडून विकत घेतले होते. आता जर कोणी म्हणत असेल की हा चित्रपट त्याच्यावर आधारित आहे, तर ते त्यांना हवे ते विचार करू शकतात. त्याला आम्ही काही करू शकत नाही. ते आम्हाला रोखू शकत नाही. चित्रपट रिलिज झाल्यानंतर सत्य समोर येईलच."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com