'बचपन के दिन भी क्या दिन थे.दिदी और मै'; आशा भोसले यांची भावूक पोस्ट

आपल्या मोठ्या बहिणीच्या निधनानंतर धाकट्या बहिणीनं केलेली पोस्ट पाहून चाहतेही भावूक
Lata Mangeshkar with Asha Bhosle.
Lata Mangeshkar with Asha Bhosle. Instagram

ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी दिवंगत लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्यासोबतच्या बालपणीच्या काही आठवणी फोटोच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फ्रेब्रुवारी,२०२२ रोजी मुंबईतील ब्रीचकॅंडी इस्पितळात वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने केवळ मंगेशकर कुटुंबिय नाही तर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहिण. आशा भोसले यांनी सोशल मीडियावर लता दिदींसोबतचे फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे की,''बचपन के दिन भी क्या दिन थे. दिदी और मै''. धाकट्या आशा भोसले या एका उंच टेबलवर बसल्या आहेत तर मोठ्या लता दीदी त्या टेबलला धरून फोटोसाठी उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. या फोटोच्या बॅकग्राऊंडला आशा ताईंचा आवाज ऐकू येत आहे. त्या 'बचपन के दिन' हे गाणं गुणगणत आहेत. अर्थात गाताना त्यांचा गळा मात्र दाटून आलेला जाणवत आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पोस्टवर सर्वसामान्य चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हृतिक रोशननं या आशा भोसले यांनी शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर सिद्धांत कपूरनं कमेंट सेक्शनमध्ये 'लव्ह यू आजी' लिहिलं आहे. लता मंगेशकर या लांबच्या नात्यानं सिद्धांत कपूरच्या आजी होत्या. एका चाहत्यानं म्हटलंय,'कर्तृत्वान माणसं आपल्यापासून कधीच लांब जात नाहीत. त्यांच्या महान कार्याच्या रुपात ते कायम आपल्यासोबत राहतात'. दुसऱ्या एका चाहत्यानं आशा भोसले यांच्या पोस्टवर कमेंटबॉक्स मध्ये लिहिलं आहे की,'मॅम,काळजी घ्या,आणि मनानं खंबीर व्हा'. कुणी लता दिदीच्या 'जिंदगी और कुछ भी नही,तेरी मेरी कहानी है' या गाण्याची ओळ लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Lata Mangeshkar with Asha Bhosle.
Lata Mangeshkar: दीदींच्या मनात 'ती' खंत शेवटपर्यत राहिली...

लता मंगेशकर आणि आशा भोसले या अनेक कार्यक्रमात एकत्र दिसायच्या. लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा अधिक बिघडली तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आशा ताई ५ फेब्रुवारी २०२२ रोजी ब्रीचकॅंडी इस्पितळात गेल्या होत्या. त्यानंतर पेडर रोड येथील लता मंगेशकर यांच्या 'प्रभुकुंज' निवासस्थानीही त्या उपस्थित होत्या. त्या स्वतः ९० वर्षांच्या आहेत पण आपल्या मोठ्या बहिणीला अखेरचा निरोप देईपर्यंत त्यांनी त्यांची साथ सोडली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com