Asha Bhosle Birthday: लतादीदींच्या सेक्रेटरीशीच केलं होतं लग्न! बहिणीशी नेहमीच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asha Bhosle Birthday

Asha Bhosle Birthday: लतादीदींच्या सेक्रेटरीशीच केलं होतं लग्न! बहिणीशी नेहमीच...

Asha Bhosle Birthday: जगभरातील संगीत रसिकांना आपल्या अवीट सुरांनी मोहिनी घालणाऱ्या गायिका आशा भोसले यांची लोकप्रियता मोठी आहे. केवळ भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे चाहते आहे. व्हर्सेटाईल (entertainment News) सिंगर म्हणून आशाजी यांना ओळखले जाते. त्यांनी गायलेल्या गाण्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, बंगाली यासारख्या सहापेक्षा अधिक भाषांमधून त्यांनी गायन केले आहे. आशाजी (bollywood singer) या नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. बदलत्या जमान्यानुसार चालणं हे त्यांच्या स्वभावातील वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

आपण जसे आहोत तसेच कायम राहणं हे फार कमी जणांना शक्य होतं. चित्रपट क्षेत्रासारख्या ग्लॅमरस दुनियेत वावरताना साधेपणा टिकवून ठेवणं देखील सोपं नाही. मात्र आशाजी यांना ते जपले आहे. त्यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. आज आशा भोसले यांचा 89 वा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. मंगेशकर बहिणींमध्ये सर्वाधिक चर्चेतील गायिका म्हणजे आशा भोसले. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या भगिनी. लता मंगेशकर यांच्या नावाचं मोठं वलय कायम सोबत असताना आशाजी यांनी आपल्या गायकीतून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली.

आशाजीचं वैयक्तिक आयुष्य हा नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. त्यांचे लग्न, त्यांची भन्नाट लवस्टोरी यावरील अनेक किस्से चाहत्यांना माहिती आहेत. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी आशा भोसले यांनी लता मंगेशकर यांच्या सेक्रेटरीशी लग्न केलं होतं. आपल्या वयापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या व्यक्तीशी त्यांनी केलेलं लग्न तेव्हा मोठ्या वादाचा विषय झाला होता. बाकी काही का असेना आशाजी यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळांना मोठ्या धीरानं तोंड दिलं. त्या आव्हानांचा स्विकार करत वेगळी ओळख निर्माण केली.

हेही वाचा: संतांच्या वाङ्मयात प्रकटलेला गणेश....

बॉलीवूडमध्ये लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यातील वादही हा अनेकदा समोर आला आहे. त्यावर सोशल मीडियावर चर्चाही होत असते. आशा भोसले यांचे दोन विवाह झाले, पहिलं लग्न हे गणपत भोसले यांच्याशी झालं. तर दुसरं प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. 1956 मध्ये त्यांची आर डी बर्मन यांच्याशी ओळख झाली होती. त्या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झालं. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी आर डी बर्मन यांच्याशी लग्न केलं होतं. आशाताई केवळ गायिकाच नाहीत तर मोठ्या उद्योजिकाही आहेत. दुबई, कुवैत, बर्मिंगहॅम याठिकाणी मोठे हॉटेल्सही आहेत.

हेही वाचा: स्टार्टअप् मुळे सात लाखांहून अधिक जणांना मिळाला रोजगार

Web Title: Asha Bhosle Happy Birthday Sister Lata Mangeshkar Secretary First Marriage Unknown Facts

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..