'९० वर्षे थांबले, आता महाराष्ट्रभुषण मिळाला', आशाताई गहिवरल्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asha Bhosle

Asha Bhosle : '९० वर्षे थांबले, आता महाराष्ट्रभुषण मिळाला', आशाताई गहिवरल्या!

Asha Bhosle Maharashtra Bhushan Award programme : केवळ हिंदीच नाहीतर तब्बल वीस पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गात श्रोत्यांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या त्यांनी अवीट सुरावटींनी आनंद देणाऱ्या मोठ्या गायिका आशा भोसले यांना आज महाराष्ट्र भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.

आशा भोसले पुरस्काराला उत्तर देताना म्हणाल्या, मुलगी बऱ्याच दिवसांनी माहेरी आल्यासारखे वाटते आहे. महाराष्ट्रात आल्यावर वेगळीच भावना असते. दहा वर्षांची असताना माझं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. मी यापुढेही गात राहणार. मला असे वाटते की, महाराष्ट्रभुषण मिळाला तो मला भारतरत्नासारखा आहे. माझ्या घरातून मिळालेला पुरस्कार आहे. मी ९० वर्षांपर्यत थांबले आहे.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

दत्ता डावजेकर, सुधीर फडके, वसंत प्रभु, वसंत पवार, पु.ल.देशपांडे, श्रीनिवास खळे, हदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या संगीतकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. मी फक्त मराठीच नाहीतर साऱ्या महाराष्ट्राची कन्या आहे. माझ्या यशात सर्वांचा वाटा आहे.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आशा ताईंना देताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपण अनेकवेळा व्हर्सेटाईल शब्द वापरतो.त्या शब्दाची व्याख्या म्हणजे आशा ताई आहेत. त्यांनी गायलेली गाणी खूप अवीट आहे. त्यांनी भक्तीगीत ते पॉप, रॉक पर्यत सर्व प्रकारची गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांनी त्यांचे वैशिष्ट्य सातत्यानं जपले आहे.

वीस भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली आहेत. हजारो गाणी त्यांनी गायली आहेत. त्या प्रत्येक गाण्यात त्यांनी वेगळेपण जपले आहेत. शतकामध्ये दुसऱ्या आशा भोसले होत नाही. मंगेशकर कुटूंबियांनी जी संगीताची सेवा केली ती अविस्मरणीय आहे. कुठलाही पुरस्कार त्या सेवेपुढे छोटाच आहे. आपलेपण पोहचवण्याचा छोटासा प्रयत्न आहे.