खरंच ऋत्विक-आशाच्या नात्याचा 'दि एण्ड' झालाय का?, पाहा आशा काय म्हणाली...

rithvik asha
rithvik asha

मुंबई : कलाक्षेत्रामधील कलाकारांचं लव्ह लाईफ, त्यांच रिलेशनशिप नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे. काही कलाकार मंडळी आपल्या लव्ह लाईफबाबत अगदी बिनधास्त, बेधडक बोलतात तर काही मौन पाळणंच पसंत करतात. काहींना आपलं खाजगी आयुष्य जगासमोर मांडणं पटत नाही. मात्र बऱ्याच अशा सेलिब्रेटी जोड्या आहेत ज्या सोशल मीडियाद्वारे आपलं प्रेम व्यक्त करत असतात. यातीलच एक जोडी म्हणजे अभिनेता ऋत्विक धनजानी आणि अभिनेत्री आशा नेगी. ऋत्विक-आशाचं रिअल लाईफ नातं पाहून अनेक जण या जोडीच्या प्रेमात आहेत. गेली सहा वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मात्र गेल्या बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये ठिणगी पडली असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

खरंच ऋत्विक-आशाच्या नात्याचा 'दि एण्ड' झालाय का? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. सतत होत असणाऱ्या चर्चांमध्ये तथ्य आहे का? असा प्रश्नही या दोघांच्या चाहत्यांना सतावत होता. आता या साऱ्या चर्चांबाबत आशानं आपलं मौन सोडलं आहे. आशाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ऋत्विकबरोबर झालेल्या ब्रेकअपबाबत खुलासा केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तू है तो दिल जानता है.. I’ll be alright! #growingtogether

A post shared by MsNegi (@ashanegi) on

आशा म्हणते, की लोक विभक्त होतात, नाती तुटतात, पण आयुष्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण त्या व्यक्तिच्या आठवणी बरोबर घेऊनच पुढे निघून जातो. माझ्या खाजगी आयुष्यावर फारसं बोलणं मला आवडत नाही. मी फक्त एवढंच सांगेन की अजूनही आम्ही दोघं एकमेकांचा आदर करतो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Diwali

A post shared by MsNegi (@ashanegi) on

सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ऋत्विक-आशाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. झी टीव्ही वाहिनीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेदरम्यान या दोघांची भेट झाली. 2013मध्ये या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली. इतकंच काय तर ऋत्विक-आशाचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला होता. 'नच बलिये 6' या डान्स रिऍलिटी शोचे हे दोघं विजेते देखील आहेत. हे दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याचंही बोललं जात होतं. 

asha negi on rumours of break up with rithvik dhanjani

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com