Asha Parekh : कधीच लग्न न करण्याच्या निर्णयावर काय म्हणाल्या होत्या आशा पारेख

अभिनेत्री आशा पारेख यांना २०२२ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे
Asha Parekh Latest News
Asha Parekh Latest NewsAsha Parekh Latest News

Asha Parekh Latest News आशा पारेख यांनी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाईफमुळेही त्या चर्चेत होत्या. आशा पारेख (Asha Parekh) चित्रपट निर्माते नासिर हुसैन यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. मात्र, नासिर विवाहित असल्याने हे नाते फार काळ टिकले नाही. आशा नासिरवर खूप प्रेम करीत होत्या. मात्र, त्यांना प्रेमासाठी कोणाचं घर, कुटुंब तोडायचं नव्हतं. खुद्द आशा यांनी हे सांगितले होते. अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

अविवाहित राहण्याचा निर्णय अगदी योग्य होता. मी एका विवाहित पुरुषावर प्रेम केले. परंतु, मला त्यांचे घर उद्ध्वस्त करायचे नव्हते. त्यांच्या मुलांवर अत्याचार करायचा नव्हता. म्हणूनच मी प्रेमाकडे दुर्लक्ष केले. वेळ आणि परिस्थिती सर्वकाही असते. जे घडायचे आहे ते तुम्ही थांबवू शकत नाही. जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्ही ठेवू शकत नाही, अशा (Asha Parekh) आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या निर्णयावर आशा मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

Asha Parekh Latest News
Yash Chopra Birth Anniversary : यश चोप्रांच्या ‘या’ रोमँटिक चित्रपटांनी जागवले प्रेम

आशा यांनी एकदा सांगितले होते की, एकदा त्या लग्न करणार होत्या. परंतु, त्यांच्यासोबत पुन्हा जुनी गोष्ट घडली. ‘अमेरिकेत राहणाऱ्या प्रोफेसरच्या खूप जवळ आली होती. त्यांच्याशी लग्न करायचे होते. त्यांना अनेकदा भेटली होती. आम्ही एक दिवस कॅफेमध्ये बसलो होतो. मला सांगितले की माझी एक प्रेयसी आहे आणि तुम्ही आल्या’ असे आशा यांनी सांगितले.

यानंतर आशा यांनी पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ‘कदाचित लग्न करणे नशिबात नव्हते. मला लग्न करायचे होते आणि मुले व्हावीत अशी इच्छा होती. परंतु, तसे झाले नाही. आता याबद्दल कोणताही पश्चाताप नाही’ असेही आशा यांनी सांगितले होते. आईने अनेक मुले बघितले. परंतु, ते योग्य वाटले नाही. काही काळानंतर आईनेही हार मानली, असेही आशा यांनी सांगितले होते.

Asha Parekh Latest News
Gauri Khan : ‘हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण...’ सुहानानंतर गौरीचा आर्यनला सल्ला

दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

अभिनेत्री आशा पारेख यांना २०२२ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार शुक्रवारी देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com