Yash Chopra Birth Anniversary : यश चोप्रांच्या ‘या’ रोमँटिक चित्रपटांनी जागवले प्रेम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yash Chopra Birth Anniversary News

Yash Chopra Birth Anniversary : यश चोप्रांच्या ‘या’ रोमँटिक चित्रपटांनी जागवले प्रेम

Yash Chopra Birth Anniversary News बॉलिवूडमधील लोकप्रिय, यशस्वी दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा (Yash Chopra) यांची आज जयंती आहे. यश चोप्रा हे त्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये रोमान्सचा नवा चेहरा दाखवला आहे. त्यांनी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त रोमँटिक चित्रपटांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाही तर बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरीही केली.

यश चोप्रा (Yash Chopra) दिग्दर्शित चांदनी हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऋषी कपूर, विनोद खन्ना आणि श्रीदेवी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाची कथा चांदनी मथुपरवर आधारित आहे. जी एक सुंदर स्त्री आहे. तिच्यावर २ लोक प्रेम करतात. कथेशिवाय चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटातील मितवा, मेरे हाथों में मेहबूबा ही हिट गाणी आजही सर्वांच्या हृदयावर राज्य करतात.

हेही वाचा: Gauri Khan : ‘हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण...’ सुहानानंतर गौरीचा आर्यनला सल्ला

शाहरुख खान, करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित स्टारर दिल तो पागल है हा चित्रपट हिट ठरला होता. हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा एका म्युझिकल ग्रुपवर आधारित आहे. ज्यामध्ये लव्ह ट्रँगल दाखवण्यात आला आहे.

वीर झारा हा यश चोप्रा दिग्दर्शित एक रोमँटिक चित्रपट (Romantic Movies) होता. ज्यात शाहरुख खान आणि प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. वीर भारतीय वायुसेनेत होता आणि झारा पाकिस्तानची होती. दोन देशांमध्‍ये अडकलेली ही प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

हेही वाचा: Sukesh Chandrasekhar : निक्की, सोफियाने तिहार तुरुंगात सुकेशची घेतली दोनदा भेट

दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट होता जब तक है जान. त्यांचा मुलगा आदित्यने या चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाची कथा बॉम्ब डिफ्यूझर असलेल्या समर आनंदवर आधारित आहे. समरचे कोणावर तरी खूप प्रेम होते. परंतु, तिच्या जाण्याने तो तुटतो. त्यामुळेच तो बॉम्ब डिफ्यूझरचा व्यवसाय निवडतो. त्याच्या आयुष्यात एक इंटर्न येते आणि समरची प्रेमकथा ऐकून दोघांना पुन्हा एकत्र करण्याचा निर्णय घेते.