
आशुतोष राणाचा 'शिव तांडव' व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट, अभिनेत्यासह चाहते नाराज
आशुतोष राणा यांनी महाशिवरात्रीनिमित्त स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये आशुतोष शिव तांडव स्रोताचे पठण करताना दिसत होते. काही वेळातच व्हायरल झालेला हा व्हिडिओ फेसबुकवरून अचानक गायब झाला. यानंतर आशुतोष राणा आणि त्यांच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले. (Ashutosh Rana slams Facebook for deleting his video on Mahashivratri)
बॉलीवूडचा उत्कृष्ट अभिनेता आशुतोष राणा केवळ त्याच्या चित्रपटांसाठीच नाही तर त्याच्या भाषा, कविता आणि उत्कृष्ट भाषणांसाठीही प्रसिद्ध आहे. आशुतोष सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी कनेक्टेड राहतो आणि मनोरंजक व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडिओंनाही चांगलीच पसंती मिळत आहे. आता त्याचा असाच एक लोकप्रिय व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट करण्यात आला आहे, ज्यावर आशुतोषसह चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
आशुतोषने 1 मार्चला महाशिवरात्रीनिमित्त एक दिवस आधी 'शिव तांडव स्रोत' (Ashutosh Rana shiv tandav video) चा व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आशुतोष आपल्या आवाजात शिव तांडव स्रोताचे पठण करताना दिसत होते. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शेअर केलेला हा व्हिडीओ सगळ्यांना खूप आवडला आणि काही तासांतच व्हायरल झाला. आता हा व्हिडिओ फेसबुकवरून गायब आहे.
यावर नाराजी व्यक्त करत आशुतोषने त्यांच्या टाइमलाइनवर लिहिले की, ''मी थक्क झालो आहे. काल महाशिवरात्रीला मी शिव तांडव स्तोत्राचा व्हिडिओ शेअर केलेली पोस्ट माझ्या टाइमलाइनवरून गायब आहे.. आपोआप! असे का घडले असेल, मला कारण समजले नाही? कारण ना तो मी डिलीट केला आहे, ना तो व्हिडीओ कोणाच्या भावना दुखावणारा होता ना तो FB च्या नियमांच्या विरुद्ध होता. #Facebook ने ही बाब विचारात घ्यावी.''
आशुतोषच्या या पोस्टवर चाहतेही नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवत आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आशुतोष राणा नुकताच 'द ग्रेट इंडियन मर्डर' या वेब सीरिजमध्ये दिसला होता. या मालिकेचे दिग्दर्शन तिग्मांशु धुलिया यांनी केले असून, त्यात आशुतोषच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. आता आशुतोष लवकरच 'शमशेरा', 'पठाण' आणि 'पृथ्वीराज' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
Web Title: Ashutosh Rana Slams Facebook For Deleting His Video On Mahashivratri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..