Zenda 2: अवधूत गुप्तेची मोठी घोषणा! या नेत्याच्या राजकीय जीवनावर येणार 'झेंडा 2' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

avadhoot gupte announced zenda 2 marathi movie on bjp leader girish mahajan political journey nsa95

Zenda 2: अवधूत गुप्तेची मोठी घोषणा! या नेत्याच्या राजकीय जीवनावर येणार 'झेंडा 2'

Zenda 2 Movie:  अवधूत गुप्ते दिग्दर्शित 2009 मध्ये आलेल्या 'झेंडा' या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. शिवसेना- मनसे या दोन पक्षातला आणि ठाकरे कुटुंबातला राजकीय थरार या चित्रपटात दाखवण्यात आला होता. हा चित्रपट मराठीतील एक अत्यंत महत्वाचा चित्रपट मानला जातो. विशेष म्हणजे हा अवधूतचा पहिला दिग्दर्शन केलेला चित्रपट. या चित्रपटानंतर त्याने अनेक चित्रपट केले. पण 'झेंडा 2' कधी येणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. अखेर त्याची घोषणा झाली आहे.

(avadhoot gupte announced zenda 2 marathi movie on bjp leader girish mahajan political journey )

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: असे लोक हवेत जे कधीही आग लावू शकतात.. अमृता फडणवीसांचं वादग्रस्त विधान

नुकतच जामनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात अवधूत गुप्ते (avdhoot gupte) याने 'झेंडा 2' बाबत सांगितले. जामनेर येथे भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातर्फे अवधूत गुप्तेच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर मनोगत व्यक्त करताना आपली इच्छा बोलून दाखवली.

अवधूत गुप्ते म्हणाला, 'कार्यकर्ते जेवढे हतबल असतात तितकाच नेता हतबल असतो हे दाखवणारा झेंडा-2 चित्रपट असू शकतो. जळगाव जिल्ह्याला गिरीश महाजन सारखं नेतृत्व लाभलं. भाजपातील ज्येष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांना या प्रवासात  घरापासून पक्षापासून अनेक आव्हानांचा, विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर भविष्यात झेंडा चित्रपट चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे.' असे अवधूत गुप्तेने जाहीर केले. 

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: सगळे निर्णय मीच घेते.. हे काय बोलून गेल्या अमृता फडणवीस..

जामनेर येथे  पार पडलेल्या या कार्यक्रमात अवधूत गुप्तने गिरीश महाजन यांची मुलाखती घेतली. या मुलाखतीत अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर देत आपला राजकीय प्रवास उलगडला. हा प्रवास ऐकून अवधूत भारावून गेला आणि त्याच मंचावरून त्याने 'झेंडा 2' हा गिरीश महाजन यांच्या आयुष्यावर करणार असल्याचे सांगितले.