Bigg Boss Marathi 4: असे लोक हवेत जे कधीही आग लावू शकतात.. अमृता फडणवीसांचं वादग्रस्त विधान

बिग बॉस मराठीच्या घरात त्यांनी हे खळबळजनक विधान केले आहे.
amruta fadnavis talks about maharashtra politics and devendra fadnavis in Bigg Boss Marathi s 4
amruta fadnavis talks about maharashtra politics and devendra fadnavis in Bigg Boss Marathi s 4sakal

bigg boss marathi : बिग बॉस च्या घरात सदस्यांची भांडणं, वाद आपल्याला परिचित आहेतच. पण आता सदस्यांपेक्षा अमृता फडणवीसच जास्त चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात त्यांनी हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक विधाने करत सर्वांना धक्काच दिला.

(amruta fadnavis talks about maharashtra politics and devendra fadnavis in Bigg Boss Marathi s 4)

amruta fadnavis talks about maharashtra politics and devendra fadnavis in Bigg Boss Marathi s 4
Bigg Boss Marathi 4: सगळे निर्णय मीच घेते.. हे काय बोलून गेल्या अमृता फडणवीस..

आपल्या गाण्यांमुळे आणि राजकीय विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या अमृता फडवणीस आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत, त्याचं कारणही अगदी खास आहे. अमृता सध्या बिग बॉसच्या घरात धमाल करत आहेत. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमृता यांनी काही राजकीय विधाने केली आहेत.

'बिग बॉस मराठी'मध्ये (bigg boss marathi) दिवाळीचे दणक्यात सेलिब्रेशन सुरू आहे. अगदी कंदील बनवण्यापासून ते फराळ खाण्यापर्यंत दिवाळीचा आनंद स्पर्धक लुटत आहेत. नुकतीच या घरात राजवर्धन आणि कावेरी या कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावली. काल तर चक्क महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडवणीस यांनी बिग बॉस मराठीच्या घरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्पर्धकांसोबत धमाल केलीच पण एक मोठे विधानही केले.

amruta fadnavis talks about maharashtra politics and devendra fadnavis in Bigg Boss Marathi s 4
Madhurani Prabhulkar: आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरला गंडा!

यावेळी किरण माने आणि यशश्री मसूरकर या दोघांनी अमृता फडणवीसांना काही प्रश्न विचारले. किरण म्हणाले, ''महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळ हे बिग बॉस असेल तर त्यातले टॉप पाचचे सदस्य कोण असतील असं तुम्हाला वाटतं. त्यावर अमृता म्हणाल्या,. 'आपल्याला डॅशिंग लोक लागतात. जे कुठेही काहीही बोलतू शकतील. जे आग लावू शकतील.' पुढे किरण म्हणाले, 'आमच्याप्रमाणे तुमच्यातही वाद होत असतील. हे काम कोण करणार, ते काम कोण करणार..' त्यावर अमृता म्हणाल्या.. 'त्यासाठी नवरा हाताला तर लागायला हवा..' त्यांच्या या धम्माल उत्तराने सर्वांनाच हसू आले. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com