Avatar Box Office Collection : निळ्या रंगाची जादू कायम; कमाईचे आकडे थक्क करणारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Avatar Box Office Collection

Avatar Box Office Collection : निळ्या रंगाची जादू कायम; कमाईचे आकडे थक्क करणारे

Avatar Box Office Collection एखादा चित्रपट १३ वर्षांनंतर प्रदर्शित होऊन चांगली कामगिरी करत असेल नवलच वाटायला हवे.... हे घडले आहे अवतार (Avatar) चित्रपटासोबत... ‘अवतार: वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित करण्यापूर्वी जेम्स कॅमेरॉन यांनी चित्रपटाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित केला. हा चित्रपट २३ सप्टेंबरला ४,००० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला. १३ वर्षांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहे.

‘अवतार’ने तीन दिवसांत २०० कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २४४ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ५०,७३० कोटींवर गेले आहे. भारतात राष्ट्रीय सिनेमा दिन आणि नवरात्रीच्या पहिल्या ४ दिवसांमध्ये तिकीट दर कमी ठेवण्याच्या निर्मात्यांच्या निर्णयामुळे येत्या आठवड्यात ‘अवतार’ (Avatar) बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकेल, असे बोलले जात आहे.

हेही वाचा: Asha Parekh : कधीच लग्न न करण्याच्या निर्णयावर काय म्हणाल्या होत्या आशा पारेख

हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांच्या अवतार चित्रपटाचा दुसरा भाग डिसेंबरमध्ये येणार आहे. अलीकडेच ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चे नवीन पोस्टर प्रदर्शित केले आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून ८० दिवस बाकी आहेत.

‘अवतार पार्ट १’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा पहिला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जेम्स कॅमेरॉन काय नवीन स्टोरी घेऊन येणार आहे हे पाहणे मनोरंजक राहील. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडून सगळ्यांनाच खूप आशा आहेत.

टॅग्स :moviehollywood