
थेनॉसने जो फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे तो पूर्णपणे विवस्त्र स्वरुपातील आहे.
मुंबई - मोठे कलाकार म्हटले की कोण काय करेल, कसे वागेल याचा काही भरवसा नाही. सेलिब्रेटी असल्यानं आपण कसही वागलो तरी चालते की काय असेही त्यांना वाटायला लागते. असाच एक प्रकार अॅव्हेन्जर मधील एका प्रसिध्द कलाकाराच्या बाबत दिसून आला आहे. तुम्हाला या जगप्रसिध्द चित्रपटाचील व्हिलन थेनॉस माहिती असेलच. त्यानं त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे तो भलताच चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसचं आहे.
थेनॉसने जो फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे तो पूर्णपणे विवस्त्र स्वरुपातील आहे. एका समुद्रकिनारी निवांतपणे कॉफी पिण्याचा आस्वाद तो घेत आहे. त्यानं तो फोटो व्हायरल केला आहे. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांनी त्याच्या अशाप्रकारच्या वागण्याला नावे ठेवली आहेत. तर काहींनी असं ओंगळवाण वागून काय मिळवलं असा सवालही त्याला केला आहे. थेनॉसची भूमिका करणारा जॉश हा हॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा अॅव्हेंजर्स च्या पूर्ण मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाच्या शेवटच्या भागात तो एंडगेममध्येही दिसला होता. या सुपरहिरोपटात तो खलनायक थेनॉसच्या भूमिकेत झळकला होता. अॅव्हेंजर्समुळे भारतातही जॉशचा एक मोठा प्रेक्षक आहे.
जॉश स्कॉटलंडमध्ये आपल्या पत्नीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत असून घराबाहेर विवस्त्र अवस्थेत बसून कॉपी घेत असतानाचा हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर दिलेल्या कमेंटही मोठ्या गंमतीशीर आहेत. काहींनी त्याला कमेंट दिली आहे की, थेनॉस निवृत्त होऊन अशा कुठल्या ग्रहावर पोहोचलाय जिथे कपडेच घातले जात नाहीत
जॉशच्या अशा फोटोमुळे त्याच्या भारतातल्या प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
बिग बॉस: राहुल वैद्यच्या धमाकेदार एंट्रीवर गर्लफ्रेंड दिशा परमारने दिली प्रतिक्रिया
गेल्या काही दिवसांपासून अनेक भारतीय आणि विदेशी कलावंतांनी आपले विवस्त्र फोटो टाकले आहेत. त्यामुळे सोशल माध्यमांवर त्यांना टीकेला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. मिलिंद सोमण, अभिनेत्री अॅमी जॅक्सन, पूनम पांडे, शर्लिन चोप्रा, कश्मिरा शाह सारख्या कलाकारांनी आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.