esakal | आयुष्मान 'अ‍ॅक्शन हिरो' च्या भूमिकेत, नवा लूक लक्षवेधी
sakal

बोलून बातमी शोधा

आयुष्मान 'अ‍ॅक्शन हिरो' च्या भूमिकेत, नवा लूक लक्षवेधी

आयुष्मान 'अ‍ॅक्शन हिरो' च्या भूमिकेत, नवा लूक लक्षवेधी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुरानाने आजवर अनेक हटके भूमिका साकारल्या आहेत. कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी भूमिकांमधून आयुष्मानने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत . मात्र आता आयुष्मान एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मानच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा झालीय. हा सिनेमा रोमॅण्टिक, विनोदी किंवा कोणताही सोशल मेसेज बरोबरच हा पूर्णपणे अ‍ॅक्शन सिनेमा असणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलिज करण्यात आला आहे. या सिनेमाचं नाव ‘अ‍ॅक्शन हीरो’ असं असून आयुष्मान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केलाय. हा टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं, “अडचण फक्त एकच आहे की मला भांडण्याचा अभिनय करता येतो पण भांडता येत नाही, काही तरी वेगळं करण्यासाठी मी खूप उत्साही आहे.” असं कॅप्शन त्याने दिलं आहे. आयुष्मानच्या टीझरला त्याच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. अनिरुद्ध अय्यर दिग्दर्शित आणि आनंद एल राय निर्मित या अॅक्शन चित्रपटाला कॉमेडी टच देखिल असणार आहे , आयुष्मान जो पहिल्यांदाच एका अॅक्शन चित्रपटात काम करणार आहे, त्याने सांगितले की तो स्क्रिप्टच्या प्रेमात पडला. "मला ‘अॅक्शन हिरो’ची स्टोरी प्रचंड आवडली. याची स्टोरी हटके, फ्रेश आणि इंटरेस्टिंग आहे" आयुष्मान म्हणाला. पहिल्यांदाचा आयुष्मानाचा अ‍ॅक्शन अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

निर्माते आनंद एल राय म्हणाले “आम्ही पहिल्यांदाच अशा शैलीचा चित्रपट करणार आहोत, आमचा हा आयुष्मानसोबतचा तिसरा चित्रपट आहे. त्याच्यासोबत पून्हा काम करण्यासाठी मी खूप उत्साहित आहे." ‘अ‍ॅक्शन हिरो’ हा सिनेमा २०२२ सालामध्ये थेटर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच शूटिंग भारतासह इंग्लडमध्ये होणार आहे. याआधी आयुष्मानने आनंद एल राय सोबत ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हे दोन चित्रपट केले आहेत.

हेही वाचा: "खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"

हेही वाचा: NCB : ड्रग्स विक्रेता ताब्यात; आर्यन खानशी संबंध?

loading image
go to top