#prabhas20 : प्रभासच्या चाहत्यांसाठी खुशखबर, १० जुलैला होणार नव्या सिनेमाची घोषणा

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
Thursday, 9 July 2020

प्रभासच्या आगामी सिनेमाचं नाव आणि त्याविषयीची माहिती लवकरंच तुमच्यासमोर येणार आहे. स्वतः प्रभासने याविषयी सोशल मिडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे.

मुंबई- 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभासच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रभासच्या आगामी सिनेमाचं नाव आणि त्याविषयीची माहिती लवकरंच तुमच्यासमोर येणार आहे. स्वतः प्रभासने याविषयी सोशल मिडियावर पोस्ट करुन माहिती दिली आहे. प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन #prabhas20 असं लिहून लवकरंच त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईज घेऊन येत असल्याचं सांगितलं आहे.

धक्कादायक : मनोरंजनविश्वाला आणखी एक धक्का! सुशांतनंतर आणखी एका टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या

'बाहुबली' प्रभासच्या आगामी सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभासने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रभासने #prabhas20 असं म्हणत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये #prabhas20 चा फर्स्टलूक १० जुलै रोजी सकाळी १० वाजता रिलीज करणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. तसंच हा सिनेमा सध्या तरी प्रभास २० या नावाने सांगितला जातोय. या फोटोमध्ये लिहिल्यानुसार हा सिनेमा तेलूगू, हिंदी, तमिळ, मल्याळम या भाषांमध्ये रिलीज केला जाईल.

या सिनेमात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे झळकणार आहे. युवी क्रिएशनने देखील सिनेमाशी संबंधित ही महत्वाची माहिती सोशल मिडियावर शेअर केली आहे. ट्विटवरवर त्यांनी ही पोस्ट शेअर केली असून महत्वाची अनाऊन्समेंट १० जुलैला सकाळी १० वाजता होणार असल्याचं सांगितलं आहे. प्रभासचा हा सिनेमा २ वर्षांपासून तयार होत आहे. निर्माते या सिनेमाचं शूटींग या वर्षाच्या शेवटपर्यंत संपवण्याच्या विचारात आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही एक पिरेड लव्हस्टोरी आहे. जी इटलीच्या बॅकड्रॉपवर आधारित असेल. अभिनेत्री पूजा हेगडे या सिनेमात प्रिंसेसची भूमिका साकारताना दिसेल. प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या सिनेमात प्रियदर्शी, भागश्री हे देखील मुख्य भूमिका साकारत आहेत. प्रभास २० च्या टीमने  जॉर्जियामध्ये या सिनेमाचा महत्वाचा सिक्वेंन्स शूट केला आहे. यानंतर कोरोनाच्या संकटामुळे या सिनेमाचं शूटींग रखडलं. हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे. 

याआधी प्रभासचा 'साहो' हा सिनेमा रिलीज झाला होता. यात बॉलीवूडमधले अनेक बडे सेलिब्रिटी दिसून आले होते. प्रभाससोबत श्रद्धा कपूर देखील होती. मात्र हा सिनेमा प्रभासच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नाही.   

baahubali actor prabhas 20 title and first look poster to release on july 10  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baahubali actor prabhas 20 title and first look poster to release on july 10