दिग्दर्शक निपुण धर्माधिकारीचा ‘बापजन्म’ चित्रपट १५ सप्टेंबरला होणार प्रदर्शित

टीम ई सकाळ
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई : एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘बापजन्म’ या चित्रपटाचे टीझर पोस्टर १५ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया, सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रोडक्शन्स यांनी केली आहे. युवा आणि प्रतिभाशाली निपुण धर्माधिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचा एक हटके टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. बहुप्रतीक्षित ‘बापजन्म’ हा चित्रपट १५ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
 
निपुण धर्माधिकारी हे आज घराघरात पोहोचलेले नाव आहे. आणि त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी २००९ मध्ये ‘नाटक कंपनी’ या संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून शेक्सपियरच्या परंपरेलाही उजाळा दिला गेला. या नाटकांची मराठी रंगभूमीवर तर वाहवा झालीच पण त्याचबरोबर अमेरिकेतील आणि अगदी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवातही त्यांना मानाचे स्थान मिळाले.
 
भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुण यांची ख्याती आहेच, पण त्याचबरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये कलाकार आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यांत ‘नौटंकी साला’ (२०१३) आणि ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) यांचा समावेश आहे. निपुण यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘बापजन्म’ या आगामी चित्रपटाने रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. हा चित्रपट प्रचंड यश संपादन करेल याबाबतही आता शंका उरलेली नाही.

‘बापजन्म’ची प्रस्तुती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २ यांसारखे अनेक गाजलेले चित्रपट देणाऱ्या ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची आहे.

Web Title: baapjanma teaser poster esakal news