सैफ अली खानच्या 'बाजार'चा ट्रेलर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सिनेमात सैफ अली खान सोबत अभिनेत्री राधिका आपटे, चित्रांगदा सिंग आणि अभिनेता रोहन मेहरा या कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहे. रोहन मेहरा 'बाजार'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

अभिनेता सैफ अली खानचे करिअर सध्या सिनेसृष्टीत फारसे यशस्वी राहिले नाही. सैफचे शेवटचे दोन सिनेमे 'रंगून' आणि 'शेफ' हे बॉक्स ऑफिसवर आपटले. पण आपल्या करिअरला सावरत  सैफ आणखी एका सिनेमासोबत पुनरागमन करत आहे. हा सिनेमा आहे 'बाजार'.
 

सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. सिनेमात सैफ अली खान सोबत अभिनेत्री राधिका आपटे, चित्रांगदा सिंग आणि अभिनेता रोहन मेहरा या कलाकारांच्या प्रमुख भुमिका आहे. रोहन मेहरा 'बाजार'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सैफने सिनेमात शकुन कोठारी ही प्रमुख भुमिका साकारली आहे. शकुन कोठारीची पत्नी मंदिरा कोठारीची भुमिका चित्रांगदा सिंगने निभावली आहे. बिझनेस, त्यातील नफा-तोटा, आर्थिक व्यवहार आणि या सर्व गोष्टींच्या अवतीभोवती फिरणारी गुन्हेगारी यावर आधारीत 'बाजार' असल्याचे ट्रेलर वरुन दिसते. सिनेमाचे दिग्दर्शन गौरव चावला यांनी केले आहे. 

सिनेमाची निर्मिती मोनिशा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी यांनी केली आहे. येत्या 26 ऑक्टोबरला 'बाजार' प्रदर्शित होणार आहे. 


 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baazaar Movie Trailer Released