..अन दिव्या दत्ता तीन तास जमिनीखाली राहीली!

टीम ई सकाळ
सोमवार, 17 जुलै 2017

सिनेमा बनवणे हे साधे काम नाही. त्याला मिळणारे ग्लॅमर पाहता त्याचा मोह भल्याभल्यांना होतो. पण त्यासाठी कलाकार कामही खूप करत असतात. अभिनेत्री दिव्या दत्ताचे असेच काहीसे झाले आहे. बाबूमोशाय बंदूकबाज या सिनेमाच्या सीनसाठी ती तब्बल तीन तास जमिनीखाली राहीली होती.

मुंबई : सिनेमा बनवणे हे साधे काम नाही. त्याला मिळणारे ग्लॅमर पाहता त्याचा मोह भल्याभल्यांना होतो. पण त्यासाठी कलाकार कामही खूप करत असतात. अभिनेत्री दिव्या दत्ताचे असेच काहीसे झाले आहे. बाबूमोशाय बंदूकबाज या सिनेमाच्या सीनसाठी ती तब्बल तीन तास जमिनीखाली राहीली होती.

या सिनेमातील एका दृश्यात दिव्याला जमिनीखाली गाडून घ्यायचे होते. केवळ शीर जमिनीवर आणि धड जमिनीखाली असा हा प्रकार होता. परंतु लखनऊ सारख्या भागात कमालीची उष्णता असूनही दिव्याने हे दिव्य पत्करले आणि निभावले. सिनेमात तिचा हा अवतार दिसेल. ती जमिनीखाली गेल्यानंतर सर्व टिम कामाला लागली आणि पुढच्या तीन तासात त्याचे सर्व सीन शूट करण्यात आले. 

Web Title: Babumoshai bandukbaaz divya dutta esakal news