
'इंडियाज् गॉट टॅलेंट'(India's Got Talent) या सोनी टी.व्हीवर दाखविल्या जाणाऱ्या कार्यक्रमात स्पर्धक खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट्स दाखवतात. अनेकदा ते स्टंट्स पाहून परिक्षकांपासून उपस्थितांचीही बोबडी वळते. शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty),बादशहा(Badshah),किरण खेर,मनोज मुंताशीर हे परिक्षक खरंतर आपल्यातील कलागुणांनी शो चे परिक्षण करताना तिथलं वातावरण खूप हलक-फुलकं मजेशीर ठेवायचा प्रयत्न करताना नेहमी दिसतात. पण अनेकदा काही स्टंट्समुळे परिक्षकांचेही धाबे दणाणलेले पहायला मिळतात. या शो चा एक प्रोमो नुकताच वाहिनीनं पोस्ट केला आहे.ज्या प्रोमोमध्ये स्पर्धकाचा जीव स्टंट करताना धोक्यात आला अन् परिक्षक असलेला रॅपर बादशह फुल अॅ्क्शन मूडमध्ये आलेला पहायला मिळाला. शिल्पा शेट्टीनंही घाबरून आरडाओरड केलेली त्या प्रोमोत पहायला मिळत आहे. (India's Got Talent News)
प्रोमोमध्ये प्राीतम नाथ हा स्पर्धक एक धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. प्रीतमला एका सुकलेल्या गवताच्या खोलीत बंद केलं जातं आणि या संपूर्ण खोलीला आग लावली जाते. आग वेगाने पसरते. पण प्रीतम अशा परिस्थितीत खोलीबाहेर येण्यास असमर्थ ठरताना दिसत आहे. त्याचा दुसरा सहकारी त्याच्या सहकार्यासाठी खोलीत शिरतो पण हे बघून बादशहा मात्र घाबरलेला दिसत आहे. बादशहा व शिल्पा एका स्क्रीनवर हा आऊटडोअर स्टंट पाहताना दिसत आहेत. ती टी.व्ही स्क्रीनही अचानक बंद पडते आणि मग काय काहीच दिसत नाही म्हणून घाबरून बादशहा खूप पॅनिक होतो. तेवढ्यात स्पर्धक प्रीतम मदतीसाठी ओरडताना दिसत आहे. ते ऐकून बादशहा तडक आपल्या खुर्चीवरून उठतो आणि टास्क थांबवायला बझर वाजवण्यासाठी धावतो. फायर ब्रिगेड टीमला बोलवायला लागतो. शिल्पा तर अक्षरशः किंचाळताना दिसत आहे.
या स्टंटनंतर पुढे काय घडणार आहे,त्या स्पर्धकासोबत काय झाले,हे तर येणारा एपिसो़ड बघितल्यानंतरच कळेल. आतातरी या शो चा हा छातीत धडकी भरवणारा प्रोमो व्हायरल होत आहे.या शो चा पहिला सीझन २००९ मध्ये आला होता. त्या सीझनचे परिक्षण किरण खेर,सोनाली बेंद्रे आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केले होते. यानंतर साजिद खान,धर्मेंद्र,फराह खान,करण जोहर,मलायका अरोरा अशा अनेकांनी या शो चे परिक्षण केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.