उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन महाराष्ट्रात आला आहे,कळलं का?

'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर देशी किंम जोंग उनची हजेरी उपस्थितांना हसवून गेली.
KIm Jong-un & Maharashrian Kim Jong-un 'Abhishek Barhate
KIm Jong-un & Maharashrian Kim Jong-un 'Abhishek BarhateGoogle
Updated on

गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठीवरील(Zee Marathi) एका कार्यक्रमानं महाराष्ट्रातीलच नाही तर जगातील कानाकोपऱ्यात राहणाऱ्या मराठी जनांना खो-खो हसवण्याचं काम अविरतपणे सुरू ठेवलं आहे तो शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya). निलेश साबळे आणि त्याच्या टीमची ही लोकप्रियता गेल्या काही वर्षात इतकी वाढलीय की आता हे सगळे कलाकार प्रत्येक माणसाच्या मनात घर करून राहिले आहेत. या शो मध्ये चक्क उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन दिसला अन् उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

KIm Jong-un & Maharashrian Kim Jong-un 'Abhishek Barhate
रितेश देशमुखचा मजेदार व्हिडीओ पहाच;चीनला चांगलच धरलंय धारेवर

खरंतर जगात असे पाच ते सात चेहरे असतात म्हणे जे एकमेकांसारखे दिसतात. आता त्यात किती तथ्य आहे हे माहीत नसलं तरी 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर मात्र याचा दाखला पहायला मिळाला. उत्तर कोरियाचा हुकूमशहा 'किम जोंग उन' सारखे दिसणारे बरेच चेहरे असतील. त्याच्या सारखा हुबेहूब दिसणारा नगर मधला अभिषेक बारहाते हा त्यापैकीच एक. आपला महाराष्ट्राचा 'किम जोंग उन' म्हणून त्याला ओळखलं जातं म्हणे. नुकतंच अभिषेक 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर अवतरला आणि या बावळ्या 'किम जोंग उन'ला पाहून उपस्थित कलाकार खळखळून हसायला लागले. अभिषेकची हेअरस्टाईल आणि शरीरयष्टी ही हुबेहूब 'किम जोंग उन' सारखी आहे त्यामुळे त्याला सोनईचा 'किम जोंग उन' म्हणूनही ओळखले जाते. अल्पावधीतच या महाराष्ट्राच्या 'किम जोंग उन'ला प्रसिद्धी मिळाली आहे.

KIm Jong-un & Maharashrian Kim Jong-un 'Abhishek Barhate
'किसिंग सीनआधी RT-PCR Test केली होती का?' तापसीला कपिलचा सवाल

नगरकडच्या भाषेत विनोद करीत हा किंम जोंग आणि मराठमोळा डोनाल्ड ट्रम्प तात्या यांची मिश्किल केमिस्ट्री 'चला हवा येऊ द्या' च्या कार्यक्रमात चांगलीच रंगलेली पहायला मिळाली. हा देशी किम जोंग प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करण्यात मात्र यशस्वी ठरला. महाराष्ट्राचा किम जोंग उन अशी उपमा मिळालेल्या अभिषेकला मात्र उत्तर कोरियाच्या हुकूमशहासाठी मनात खूप राग आहे. आपला चेहरा फक्त त्याच्याशी मिळता-जुळता आहे. पण आपल्याला लोकांना हसवायला आवडतं ,स्वतःमध्ये रमायला आवडतं. मी स्वतःच्या घरी देखील हुकूमशहा नाही असं हसत-हसत अभिषेक सांगतो. 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर रंगलेल्या या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षकांनाही लवकरच घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com