बाहुबलीचा 'भल्लालदेव' पाकिस्तान बॉर्डरवर ; बीएसएफच्या वर्दीत

bahubali fame bhallaldev rana daggubati viral new look in indo pak border on mission frontline
bahubali fame bhallaldev rana daggubati viral new look in indo pak border on mission frontline

मुंबई - बाहुबली चित्रपटानं रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला हा चित्रपट त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याची कथा, संवाद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटातील भूमिकांनी केवळ भारतीयच नव्हे तर जगातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेत असणारा भल्लालदेव आता थेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर जाऊन पोहचला आहे.

बाहूबलीतून प्रभासच्या वाट्याला जेवढी लोकप्रियता आली तितकीच भल्लालदेव अर्थात राणा डग्गुबातीलाही मिळाली. प्रसिध्द चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनी बाहुबलीचे दिग्दर्शन केले होते. राणा डग्गुदेव आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पॅन इंडिया स्टार होण्याची त्याची तयारी सुरु झाली आहे. त्यानं आता 'मिशन फ्रंटलाइन' च्या नव्या वेबसीरीजमध्ये बीएसएफच्या जवानाची भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्यानं विशेष मेहनत घेतली आहे. ही एक डॉक्युमेंटरी सीरिज आहे. 'मिशन फ्रंटलाइन' या मालिकेची माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राणानं याबाबत आपला अनुभव व्यक्त केला.

राणा म्हणाला की, आपल्या जवानांची महती आणि कीर्ती सगळीकडे जावी या हेतूनं त्या कलाकृती वेगवेगळ्या भाषेत तयार होणे महत्वाचे आहे. त्यामुळे जवानांचे कार्य देशाच्या कानाकोप-यात जाण्यास मदत होते. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे काही मालिका किंवा चित्रपट हे असे असतात की त्यांच्यासाठी भाषा हा काही महत्वाचा विषय नसतो. आपल्याला जे काही पाहायला मिळते तो आशय थेट हद्याला भिडल्यावाचून राहत नाही. जवानांची एक खास भाषा आहे जी सगळ्यांना एकत्र जोडून ठेवते. आपल्यातही देशभक्ती जागवते. हे सगळे प्रेक्षकांपर्यत पोहोचविण्यासाठी या माहितीपट वजा मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.

राणाच्या विचारांना समर्थन देताना दक्षिण एशिया डिस्कव्हरीच्या कंटेट डायरेक्टर सई अभिषेक म्हणाल्या, आपला प्रयत्न हा नेहमी पॅन इंडियासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राणाने 'मिशन फ्रंटलाइन' साठी 15 दिवस शुट केले आहे. त्यासाठी तो जैसेलमेरला गेला होता. तिथं त्यानं बीएसएफच्या जवानांबरोबर खास  प्रशिक्षणही घेतले आहे. याठिकाणी केलेले चित्रिकरण हे आतापर्यतच्या प्रवासातील सर्वाधिक आनंद आणि समाधान देणारे चित्रिकरण असल्याचेही त्यानं सांगितले आहे. या माहितीपटाच्या माध्यमातून जवानांचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. राणा यापुढील काळात त्याच्या कादन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com