यत्र,तत्र,सर्वत्र बाहुबली...

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 मार्च 2017

"बाहुबली 2'च्या ट्रेलरला यू ट्युबवर पाच कोटींहून अधिक रसिकांची पसंती 
मुंबई :"कटप्पाने बाहुबलीला का मारले?' या प्रश्‍नाच्या उत्तराची प्रेक्षकांनी जवळजवळ दोन वर्षे वाट पाहिली. आता या प्रश्‍नाचे उत्तर "बाहुबली 2' या चित्रपटातून 28 एप्रिलला मिळणार आहे. या चित्रपटाची उत्सुकता ताणून धरणारा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. काही तासांतच पाच कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिला. 

एस. के. राजमौली यांच्या या "बाहुबली 2 - द कन्क्‍लुजन' या चित्रपटाच्या ट्रेलरचा प्रदर्शन सोहळा गुरुवारी अंधेरी येथे झाला. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली, करण जोहर, अभिनेता प्रभास, राणा डुग्गुबट्टी आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया हे उपस्थित होते. करण जोहरने राजमौली यांचे खूप कौतुक केले. तो म्हणाला, "या चित्रपटाचे चित्रीकरण 380 दिवस सुरू होते. त्यापूर्वीही या चित्रपटाची तयारी सुरू होती. अशा प्रकारची कथा मांडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. बाहुबली या आधीच्या चित्रपटात अशा प्रकारची झलक तुम्ही पाहिली आहेच. या ट्रेलरमध्येही तुम्हाला अशीच मेहनत दिसेल.' 
अभिनेता प्रभास म्हणाला, ""मला राजमौली यांच्यासोबत काम करायचे होते. आधीही मी त्यांच्याबरोबर एका चित्रपटासाठी काम केले होते. साडेतीन वर्षांपूर्वी ते माझ्याकडे "बाहुबली'ची पटकथा घेऊन आले आणि त्यांनी तेव्हाच मला या प्रोजेक्‍टसाठी खूप वेळ जाईल याची कल्पना दिली होती. हा माझ्या आयुष्यातील "वन्स इन अ लाईफटाईम' असा चित्रपट आहे. ही संधी मला पुन्हा कधीही मिळाली नसती.'' 

Web Title: bahubali trailer amazing response