Maharashtra Din : 'बाई वाड्यावर या....' फेम निळू फुले खऱ्या आयुष्यात वेगळीच भूमिका निभावत होते

खलनायकी भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे हे व्यक्तिमत्त्व खऱ्या आयुष्यात मात्र वेगळीच भूमिका बजावत होते.
nilu phule
nilu phule sakal

मुंबई : 'बाई वाड्यावर या....' हे वाक्य प्रत्येक मराठी कुटुंबाला माहीत आहे. हा संवाद नेमका कोणत्या चित्रपटातील आहे हे कोणालाच सांगता येणार नाही. पण हा संवादासाठी एक व्यक्ती मात्र प्रसिद्ध झाली. ती व्यक्ती म्हणजे निळू फुले.

मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले. निळूभाऊ या नावाने ते प्रसिद्ध झाले. त्यांचा जन्म पुणे येथे झाला. (bai wadyavar yaa fame nilu phule real life social worker nilu phule)

त्यांचे वडील पुणे येथेच लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. उद्यानविषयक पदविकाही त्यांनी मिळविली मात्र त्यांना अभिनयाची किशोरवयापासूनच प्रचंड आवड होती. हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

nilu phule
Ashok Saraf आणि Urfiला झालेला लॅरिन्जायटिस आजार तुम्हाला झाल्यास काय कराल ?

कथा अकलेच्या कांद्याची या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून प्रकाशझोतात आले. या लोकनाट्याचे मराठी रंगभूमीवर दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकामुळे त्यांना 'एक गाव बारा भानगडी' या मराठी चित्रपटात भूमिका मिळाली व त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.

या चित्रपटात त्यांनी साकारलेली 'झेले अण्णा' ही विनोदी खलनायकाची भूमिका अत्यंत गाजली. त्यांच्या नाट्य-कारकीर्दीत विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडर या नाटकातली त्यांची खलनायकी ढंगाची भूमिका प्रभावी ठरली.

पुढारी पाहिजे, बिन बियांचे झाड, कुणाचा कुणाला मेळ नाही, कथा अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत यांसारख्या लोकनाट्यांमधून त्यांनी भूमिका केल्या आणि गाजवल्या.

'बाई वाड्यावर या' या खलनायकी संवादासाठी ते प्रसिद्ध असले तरी खऱ्या आयुष्यात त्यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय वेगळं आणि सेवाभावी होतं.

nilu phule
Hina Khan Home : 'यह रिश्ता क्या कहलाता है'मधल्या अक्षराचं आलिशान घर पाहा...

निळू फुले राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळीपर्यंत सगळीकडे त्यांनी झोकून देऊन काम केले.

निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी ते जात. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी काम केले. दुष्काळग्रस्तांसाठी राष्ट्र सेवा दलाने धान्य गोळा केलं होतं. त्यावेळी निळू फुलेंच्या स्वत:च्याही घरात धान्याचा कण नव्हता. पण तरीही त्यांनी गोळा केलेलं धान्य वापरण्यास नकार दिला होता.

कराडच्या नाट्यसंमेलनात लोकसभेचे तत्कालीन सभापती मनोहर जोशी यांनी विजय तेंडुलकर यांचं नाटककार म्हणून भरभरून कौतुक केलं होतं. याच मनोहर जोशींनी एका आंदोलनात नाट्यगृहाची वाताहत केल्याची आठवण निळू फुलेंनी त्यांना करून दिली होती.

त्यामुळे खलनायकी भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे हे व्यक्तिमत्त्व खऱ्या आयुष्यात मात्र वेगळीच भूमिका बजावत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com