Baipan Bhaari Deva: 'बाईपण भारी देवा' मधील शशी फेम वंदना गुप्तेंना झाली अटक?

Baipan Bhaari Deva:
Baipan Bhaari Deva:Esakal

Baipan Bhaari Deva: सध्या मराठी मनोरंजन विश्वातील सिनेमे हे बॉलिवूडला टक्कर देत आहे. मग त्यात रितेशचा 'वेड' असो किंवा 'महाराष्ट्र शाहिर.' बरेच मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. आता त्यात आणखी भर पडली ती बाईंच्या गँगची...

सध्या महिलांच्या या टोळीने बॉक्स ऑफिसवर राडा घातलाय. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ हा सिनेमा 30 जूनला प्रदर्शित झालाय.

या चित्रपटाला प्रेक्षकांना अपेक्षेपेक्षाही जास्त प्रेम दिलं आहे. रिलिजच्या एक आठवड्यानंतरही या सिनेमाला प्रेक्षकांची भरपुर गर्दी आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटांने तब्बल १२ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब यांच्या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकार आणि प्रेक्षक या चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहे.

Baipan Bhaari Deva:
Somy Ali Salman Khan Ex Girlfriend : सलमानची कुंडली बाहेर काढल्याशिवाय शांत बसणार नाही

'बाईपण भारी देवा' सध्या हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची खुपच गर्दी आहे. त्यातच आता चित्रपटाचे दिग्दर्शिक केदार शिंदे यांनी एक भन्नाट पोस्ट शेयर केली आहे.

यात त्यांनी म्हटलं आहे की, चित्रपटात शशीची भुमिका साकारणाऱ्या वंदना गुप्ते यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या सोबतच त्यांनी एक फोटोही शेयर केला आहे. ज्यात एक महिला पोलिस त्यांना गाडीत टाकतांना दिसते.

या फोटोसोबत त्यांनी लिहिलयं की, 'बाईपण भारी देवा ह्या सिनेमाला फक्त महिलांची गर्दी का ? या मुद्द्यावर सिनेमातील शशीला अटक !! आता पुरुषांनी भरमसाठ गर्दी करून.. तीला सोडावावं.'

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलयं की, हे SOLID आहे. #baipanbhaarideva #बाईपणभारीदेवा . आता हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी या पोस्टवर कमेंटही करत आहेत.

Baipan Bhaari Deva:
Jawan Prevue Shah Rukh Khan: टकलु असुनही हॅंडसम दिसतोय, शाहरुखच्या जवान 'बाल्ड' लुकवर जनता दिवानी
Baipan Bhaari Deva:
Jawan Prevue Twitter Reaction: 'बॉक्स ऑफिसवर जाळ अन् धूर संगच'! नेटकऱ्यांनी शाहरुखला डोक्यावरच उचललं!

'बाईपण भारी देवा' या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर जिओ स्टुडियोजचा या चित्रपटातुन महिलांना एक भन्नाट संदेश मिळतो. महिला फक्त आपलं कुटूंबासाठी जगतात. त्या जबाबदारीच्या भानात स्वत:ला वेळ देणं आणि त्यांचे स्वप्नही विसरतात.

हा सिनेमा प्रत्येक स्त्रीला स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. मात्र या चित्रपटाचं नाव जरी 'बाईपण भारी देवा' असलं तरी हा सिनेमा प्रत्येक पुरुषानेही नक्कीच पहायला हवा.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com