Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा मधील "माईंचा सोज्वळ यजमान असा शोधला तर", हा आहे किस्सा

कोणतीही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना सतीश जोशींना बाईपण भारी देवा सिनेमात भुमिका कशी मिळाली, याचा किस्सा फार गमतीशीर आहे.
baipan bhaari deva marathi movie story about selection of Rohini Hattangady on screen husband actor satish joshi
baipan bhaari deva marathi movie story about selection of Rohini Hattangady on screen husband actor satish joshiSAKAL

Marathi Movie News : बाईपण भारी देवा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सिनेमा केवळ भारतात नव्हे तर अमेरिकेत सुद्धा बक्कळ कमाई करत आहे. माऊथ पब्लिसीटीच्या जोरावर बाईपण भारी देवा सिनेमाने सर्वांचं प्रेम मिळवलं.

सिनेमातील अनेक कलाकारांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. याच सिनेमात माई म्हणजेत रोहीणी हट्टंगडींची भुमिका साकारलीय अभिनेते सतीश जोशी.

कोणतीही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना सतीश जोशींना बाईपण भारी देवा सिनेमात भुमिका कशी मिळाली, याचा किस्सा फार गमतीशीर आहे. बघुया..

(baipan bhaari deva marathi movie story about selection of Rohini Hattangady on screen husband actor satish joshi)

baipan bhaari deva marathi movie story about selection of Rohini Hattangady on screen husband actor satish joshi
Oonchi Oonchi Waadi: भाबडा भक्त अन् भोळा शंकर, OMG 2 मधलं पहिलं गाणं भेटीला

केदार शिंदेंची नजर गेली आणि...

शाहीर साबळेंची मुलगी वसुंधरा साबळेंनी CinemaGully या ग्रुपवर हा किस्सा उलगडलाय. वसुंधरा लिहीतात.. ज्यांनी ज्यांनी बाईपण भारी देवा पाहिला त्यांना रोहीणी हट्टंगडीच्या मिस्टरांची भुमीका केलेले सतीश जोशी हे कलाकार खूप आवडले

पण काल " माझा कट्टा " हा कार्यक्रम पाहाताना मला स्वताला त्यांच्या बाबत केदार कडून आश्चर्यकारक गोष्ट समजली...

घर शोधलं आणि कलाकारही मिळाला

केदार आणि अजित भुरे हे दोघेही लोकेशन पाहायला एका घरी गेले..दरवाजा वाजवल्यावर ज्यांनी हसतमुखाने दरवाजा उघडला त्यांना पाहून केदार बघतच राहीला आणि हळूच अजित भुरेला म्हणाला "

रोहीणीताईंच्या यजमानांच्या रोल साठी हे परफेक्ट वाटतायत.." त्यावर अजित म्हणाला " अरे पण ते कलावंत नाहीत त्यांनी कधीच अभिनय केलेला नाही.."

तरीही केदार आपल्या म्हणण्यावर ठाम होता आणि मग सतीश जोशींना त्या बद्दल विचारल्यावर ते ही तयार झाले आणि त्यांनी केदारच्या दिग्दर्शनाखाली कीती अप्रतीम रोल केलाय हे ज्यांनी चित्रपट पाहीलाय त्यांना सांगायला नकोच... अशाप्रकारे सतीश जोशींची रोहीणी हट्टंगडींच्या यजमानांच्या भुमिकेत निवड करण्यात आली.

बाईपण भारी देवा बॉक्स ऑफीस

सध्या बाईपण भारी देवा महिलांच्या या टोळीने बॉक्स ऑफिसवर राडा घातलाय. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ हा सिनेमा 30 जूनला प्रदर्शित झालाय.

या चित्रपटाला प्रेक्षकांना अपेक्षेपेक्षाही जास्त प्रेम दिलं आहे. रिलिजच्या तीन आठवड्यानंतरही या सिनेमाला प्रेक्षकांची भरपुर गर्दी आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटांने तब्बल ३७ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com