बप्पी लाहिरी अभिनेतेही होते;'या' गाजलेल्या सिनेमात केलं होतं काम

बॉलीवूडचे प्रसिद्ध ज्येष्ठ गायक-अभिनेते किशोर कुमार यांच्याशी असलेल्या नात्यामुळे जुळून आला होता अभिनयाचा योग.
Bappi Lahiri
Bappi LahiriGoogle
Updated on

भारतीय सिनेसंगीत क्षेत्रावर केवळ दहा दिवसात दुसरा आघात झाला आहे. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी गानसम्राज्ञी लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांचं निधन झालं तर त्यानंतर लगेचच १५ फेब्रुवारी २०२२ रोजी 'डिस्को किंग' म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ संगीतकार-गायक बप्पी लाहिरी(Bappi Lahiri) यांची प्राणज्योत मालवल्यानं हे आणखी एक मोठं नुकसान भारतीय संगीतक्षेत्राचं आहे असं बोललं जात आहे,कारण ते सिनेसंगीतातील ट्रेंड सेटर म्हणूनही ओळखले जायचे. ८० च्या दरम्यान त्यांनी सिनेसंगीताला 'डिस्को' या संगीताच्या जॉनरशी जोडलं होतं. त्यांना आठवलं की लगेच डोळ्यासमोर येतं ते चेहऱ्यावर निर्मळ हास्य घेऊन सोन्याच्या दागिन्यांनी मढलेले बप्पी दा. पण त्यांचं संगीतातलं योगदान हे खूप मोठं आहे त्यांच्या या गोल्डन किंग इमेज पेक्षा.

सोन्याला बप्पी लाहिरी देव मानायचे. त्यांच्यासाठी सोनं खूप लकी आहे असं ते समजायचे. त्यांना सुरांची देणगी ही त्यांच्या आई-वडिलांकडूनच मिळाली होती. त्यांचा जन्म बंगाली ब्राम्हण परिवारात झाला होता. २७ नोव्हेंबर,१९५२ हा त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या वडिलांचं नाव होतं अपरेश लाहिरी आणि बासुंदी लाहिरी. ते दोघेही संगीतकार-गायक म्हणून कार्यरत होते. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तबला शिकायला सुरुवात केली होती. त्यांचे वडीलच त्यांचे गुरू होते. कारण बप्पी लाहिरी यांचे वडिल स्वतः एक प्रसिद्ध तबला वादक होते. बप्पी लाहिरी यांनी हिंदी,बंगाली सिनेमांसोबतच दक्षिण भारतीय सिनेमांच्या संगीतासाठीही काम केलं होतं. सिने- संगीतकार म्हणून त्यांची कारकिर्द १९७३ मध्ये 'नन्हा शिकारी' या सिनेमाला संगीत दिल्यानंतर सुरू झाली. या सिनेमाची निर्मिती ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि त्यांचे दिवंगत पती दिग्दर्शक शोमु मुखर्जी यांनी केली होती. या सिनेमाच्या गाण्यांना किशोर कुमार,आशा भोसले,मुकेश आणि सुषमा श्रेष्ठ यांनी आवाज दिला होता.

८० च्या दशकात डिस्को संगीतामुळे एक नवी ओळख बनवणाऱ्या बप्पी लाहिरी यांनी त्याआधी काही सुमधुर संगिताच्या चाली देऊनही काही गाणी संगीतबद्ध केली होती. यामध्ये 'जख्मी','चलते चलते' आणि 'आपकी खातिर' या सिनेमांची नावं घेता येतील. सिनेमांना संगीत देण्यासोबतच बप्पी लाहिरी यांनी गायक म्हणूनही आपलं नाव केलं होतं. १९८२ ला आलेल्या 'डिस्को डान्सर' सिनेमाच्या संगीतानं केवळ बप्पी लाहिरींच्याच आयुष्यात नाही तर बॉलीवूड संगीतातही कमाल करुन दाखवली. 'डिस्को डान्सर'ने मिथुन चक्रवर्ती जसे रातोरात स्टार झाले तसेच बप्पी लाहिरी यांच्या संगीतावर मिथुन यांनी धरलेला ठेकाही भारतीय नृत्यकला क्षेत्रात पॉप्युलर झाला. आजही मिथुनच्या त्या गाण्यातल्या स्टेप्स प्रसिद्ध आहेत.

पण हे झालं बप्पी लाहिरी यांच्या सिनेसंगीत कारकिर्दीविषयी पण त्यांनी अभिनय क्षेत्रातही आपली चमक दाखवली होती हे माहित आहे का आपल्याला. हिंदी सिनेमातील मोठे गायक-अभिनेता किशोर कुमार बप्पी लाहिरी यांचे मामा होते. त्यांच्यासोबत बप्पी लाहिरी यांचं खुप खास नातं होतं. खुप कमी जणांना माहित आहे की बप्पी लाहिरी यांनी सिनेमात अभिनयही केला होता. 'बढती का नाम दाढी' असं या सिनेमाचं आधी नाव होतं,जे पुढे जाऊन झालं 'चलती का नाम गाडी'. या सिनेमात किशोर कुमार,अशोक कुमार आणि अनुप कुमार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या सिनेमाचं दिग्दर्शन किशोर कुमार यांनी केलं होतं. या सिनेमात किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार याने देखील काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com