Shiv Thakare: 'आईची ही प्रेमळ माया' आईकडून औक्षण करुन घेत शिव निघाला खतरों के खिलाडीचा गड जिंकायला

shiv thakare, khataron ke khiladi, bigg boss 16
shiv thakare, khataron ke khiladi, bigg boss 16Esakal

बिग बॉस 16' फेम शिव ठाकरे शो संपल्यानंतरही चर्चेत आहे. शिव ठाकरे 'बिग बॉस 16' या रिअॅलिटी शो जिंकू शकला नाही मात्र त्याने त्याच्या मनमोकळ्या स्वभावाने लोकांची मने मात्र नक्कीच जिंकली. आता तो आणखी एक रिअॅलिटी शो करणार आहे. शिव ठाकरे रोहित शेट्टीच्‍या खतरों के खिलाडी 13 सह टेलिव्हिजनवर परत येण्यासाठी सज्ज झाला आहे.

shiv thakare, khataron ke khiladi, bigg boss 16
The Kerala Story row: 'तर तुम्ही देखील दहशतवादी आहात', द केरळ स्टोरी वादावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

या शोमध्ये तो धोक्यांसोबत खेळताना दिसणार आहे. कधी तो उंचावरून लटकेल तर कधी साप आणि मगरी यांच्यामध्ये स्टंटबाजी करतांना दिसणार आहे. यासाठी तो खुप उत्साहित देखील आहे. शिव या शोसाठी पुर्णपणे तयार आहे. त्याने यासाठी खुप मेहनत देखील घेतली असल्याच त्याने सांगतिले आहे. त्याने यापुर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि आशीर्वाद देखील घेतले.

shiv thakare, khataron ke khiladi, bigg boss 16
Samantha: 'अनुष्कासोबत चित्रपट नाहीच..', समांथानं स्पष्टच सांगितलं

आता शिव खतरों के खिलाडी 13 साठी सज्ज झाला असुन त्याचा प्रवास देखील सुरु झाला आहे. मात्र त्यापुर्वी त्याच्या आईचा आणि त्याचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात शिवची आई त्याचे औक्षण करत आहे. शिव आता आईचा आशीर्वाद घेवुन खतरों के खिलाडीचा 13 वा सिझन गाजवण्यासाठी निघाला आहे. त्याच्या चाहत्यांना तर पुर्णपणे विश्वास आहे की शिव हा शो नक्कीच जिंकणार आहे.

शिव ठाकरे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. त्यांने खतरों के खिलाडी 13 मध्ये भाग घेऊन त्यांच्या कामाच्या लिस्टमधील आणखी एक प्रोजेक्ट सुरू केला आहे.

shiv thakare, khataron ke khiladi, bigg boss 16
Sienna Weir Passes Away : घोडेस्वारी करताना झालेल्या अपघातात 23 वर्षीय मॉडेलचं निधन

यासोबतच त्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, "मी माझे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप जिद्दी आहे. मी जे ठरवले आहे ते साध्य करण्याचा मी प्रयत्न करतो. बिग बॉसनंतर मला फक्त चांगल्या ऑफर्स हव्या होत्या. मला मराठी चित्रपटात अभिनय करायचा आहे. आणि मला खात्री आहे की ते घडेल, पण मला रिअॅलिटी शोसाठी विशेष आवडते. KKK13 माझ्या मार्गावर आला याचा मला आनंद आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com