'फास्ट अँड फ्युरियस'9 की 'बेल बॉटम' कोण जिंकणार?

कोरोनाचा कहर आता थोडा कमी झालेला दिसतो आहे.
bell bottom and fast and furious 9
bell bottom and fast and furious 9

मुंबई - कोरोनाचा कहर आता थोडा कमी झालेला दिसतो आहे. या पार्श्वभुमीवर मनोरंजन (entertainment) क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन गेल्या काही महिन्यांपासुन रखडले होते. त्यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. आता प्रशासनानं कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिल्याचे सुत्रांकडून समजते. अशावेळी निर्मात्यांनी या संधीचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहे.

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (akshay kumar) आणि हॉलीवूडमधील फास्ट अँड फ्युरियस (fast and furious 9) हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही आगळी वेगळी पर्वणी असली तरी निर्मात्यांना मोठी चिंता आहे की, बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार? गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं मनोरंजन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कित्येक निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले. आणि तो निर्णय अंमलातही आणला. सलमान खानचा बिग बजेट राधे द मोस्ट वाँटेड भाई हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्याला थोड्याफार प्रमाणात यश मिळाले होते.

bell bottom and fast and furious 9
'मन दुखावलं, पण..'; भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक
bell bottom and fast and furious 9
'माझ्या बायकोचे नाव जेनेलिया नाही, तर..'; रितेश देशमुखने सांगितलं खरं नाव

हे दोन्ही चित्रपट 19 ऑगस्टला एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोणाची सरशी होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. फास्ट अँड फ्युरियसच्या ट्रेलरला चाहत्यांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्याच्या यापूर्वीच्या आठही भागांना जगभरातून कमालीचा प्रतिसाद मिळाला आहे. फास्ट अँड फ्युरियसचा प्रेक्षकवर्गही वेगळा आहे. त्यामुळे एकाअर्थी त्याची आणि बेल बॉटमची बॉक्स ऑफिसच्या तराजुत तुलना करणं चूकीचं होईल.

बेल बॉटममध्ये अक्षय एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतल्याचेही दिसून आले आहे. कोरोनाच्या काळात अक्षयाचा लक्ष्मी नावाचा चित्रपट आला होता. मात्र प्रेक्षकांनी या चित्रपटाला साफ नाकारले. त्यावरुन तो ट्रोलही झाला होता. आगामी काळात त्याच्या दोन वर्षांपासून रख़लेल्या सुर्यवंशी चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com