बंगाली अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीला दोषी ठरवत शेअर केला व्हिडीओ Saibal Bhattacharya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bengali Actor Saibal bhattacharya allegedly attempted Suicide share video On facebook In a hurt Condition

बंगाली अभिनेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीला दोषी ठरवत शेअर केला व्हिडीओ

Bengali Actor Saibal bhattacharya: बंगाली अभिनेता सैबल भट्टाचार्य यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी कानावर पडत आहे. या प्रयत्नादरम्यान ते जबरदस्त जखमी झाल्याचेही समोर आले जेव्हा त्यांनी फेसबूकवर आपला व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की सैबल यांनी स्वतःला मारुन जखमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा चेहरा रक्तानं माखलेला दिसत आहे. बातमी आहे की या सर्व प्रकरणानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैबल भट्टाचार्य यांना प्रोथोमा कादम्बिनी या मालिकेमुळे घराघरात ओळखलं जातं.(Bengali Actor Saibal bhattacharya allegedly attempted Suicide share video On facebook In a hurt Condition)

हेही वाचा: Taarak Mehta:निर्मात्याने बनवलं नवं कॉन्ट्रॅक्ट, यामुळे कलाकार मात्र अडचणीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री सैबल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी एका धारदार शस्त्रानं स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची तब्येत गंभीर असल्याचं बोललं जात आहे. माहिती कळत आहे की, व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही त्यांचे काही फारसे चांगले सुरू नव्हते. ते डीप्रेशनचा सामना करत होते. व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या या अवस्थेला पत्नी आणि सासरच्यांना जबाबदार ठरवलं आहे.

हेही वाचा: 'कोलकातामधील त्या थिएटरात..',अक्षयनं शेअर केलं आयुष्यातील मोठं सीक्रेट

तसंच, ज्या क्षणी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते. डिप्रेशनसोबतच ते अॅडिक्शनच्या समस्येचा देखील सामना करत होते. त्यांनी अनेक बंगाली टी.व्ही मालिकांमधून काम केले आहे. पण जसजसं काम मिळणं बंद झालं तसतसं त्यांच्या आयुष्यात नैराश्य येऊ लागलं. अभिनया व्यतिरिक्त ते पटकथा-संवाद लिहिण्याचं काम करायचे,पण तिथेही वाट्याला स्ट्रगल येत होतं ज्याचा ते सामना करु शकले नाहीत आणि आत्महत्या हा पर्याय निवडला.

Web Title: Bengali Actor Saibal Bhattacharya Allegedly Attempted Suicide Share Video On Facebook In A Hurt Condition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..