'कोलकातामधील त्या थिएटरात..',अक्षयनं शेअर केलं आयुष्यातील मोठं सीक्रेट Akshay Kumar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akshay Kumar revealed that during his intial days he worked in kolkata cinema hall.

'कोलकातामधील त्या थिएटरात..',अक्षयनं शेअर केलं आयुष्यातील मोठं सीक्रेट

Akshay Kumar: अक्षय कुमार संदर्भातली एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी समोर आलेली आहे. कदाचित लोकांना यासंदर्भात कमी माहित असावं. अक्षय कुमार त्याच्या रक्षाबंधन सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोलकाता इथं गेला असताना त्यानं याविषयी उल्लेख केला आहे. कोलकाता या शहराशी आपलं खास नातं आहे, हे सांगताना या शहराशी असलेल्या त्याच्या जवळच्या नात्याचा अभिनेत्यानं मोठा खुलासा केला आहे. सिनेइंडस्ट्रीत तब्बल ३१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अक्षय कुमारने हे सीक्रेट शेअर केलं आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय म्हणाला आहे अक्षय कुमार.(Akshay Kumar revealed that during his intial days he worked in kolkata cinema hall).

अक्षय आपला सिनेमा रक्षाबंधनला कोलकाता इथं प्रमोट करताना १९८० सालात डोकावला. ते त्याच्या करिअरचे अगदी सुरुवातीचे दिवस होते. अक्षय म्हणाला,''तो कोलाकाता येथील एका सिनेमागृहात काम करत होता. कोलाकाता येथील ग्लोब सिनेमात त्यानं जवळ-जवळ २ वर्षे काम केलं आहे. हेच कारण आहे की या शहरासाठी त्याच्या मनात खूप स्पेशल जागा आहे''.

आता ग्लोब सिनेमा बंद झाला आहे. याचं आपल्याला खूप वाईट वाटत आहे असं अक्षय म्हणाला. ग्लोब सिनेमात आपण खूप सिनेमे पाहिले आहेत. आता खरंतर ग्लोब सिनेमाची जागा मल्टिप्लेक्सने घेतली आहे पहिलं तिथे सिंगल स्क्रीन थिएटर होतं. ती इमारत हेरिटेज बिल्डिंगमध्ये गणली जायची. त्या जागेला ओल्ड ओपेरा हाऊस म्हणूनही ओळखलं जायचं.

अक्षय कुमारच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर आनंद एल.रॉय दिग्दर्शित अक्षय कुमारचा रक्षाबंधन सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त भूमी पेडणेकर,सादिया खातिब,सेहेजमीन कौर, दीपिका खन्ना आण स्मृती श्रीकांत अहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.