esakal | आई-भावाला पाठवले माझे अश्लील फोटो; प्रत्युषाची पोलिसांत तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

actress pratyusha paul

आई-भावाला पाठवले माझे अश्लील फोटो; प्रत्युषाची पोलिसांत तक्रार

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बंगाली (bengali tv actress) मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रत्युषा पॉल (pratyusha paul) हिच्याबाबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तिला अज्ञाताकडून बलात्काराची धमकी मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाटी मोठी चर्चा आहे. तिचे काही फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करुन त्याचे विकृतपणे सादरीकरण सोशल मीडियावर करण्यात आले आहे. असा आरोप तिनं त्या अज्ञात व्यक्तीवर केला आहे. बंगाली मनोरंजन क्षेत्रात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ती परिचित आहे. (bengali tv actress pratyusha paul alleges of receiving rape threats)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप त्या संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणाचा तपास सुरु आहे. सायबर पोलिसांनी (cyber police)या घटनेची नोंद घेतली आहे. तातडीनं तपास सुरु करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना पॉलनं (paul) सांगितलं, गेल्या वर्षी देखील माझ्यासोबत एकानं अशाप्रकारचे कृत्य केलं होतं. पहिल्यांदा मी याप्रकाराकडे दुर्लक्ष केलं. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: 'प्रेग्नंट आहेस का?' दीपिकाला नेटकऱ्यांचा सवाल

अखेर मी या व्यक्तीच्या विरोधात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे सोशल मीडियावरुन धमकी देणाऱ्यांना मी तात्काळ ब्लॉक करुन टाकते. जे कोणी अशाप्रकारचे कृत्य करतात ते त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट सतत बदलत असतात. आणि मला बलात्काराची धमकी देतात. त्या व्यक्तीनं माझे काही फोटो मॉर्फ केलं आणि ते एका अश्लील वेबसाईटवर टाकले. एवढेच नाही तर माझे ते फोटो माझ्या आईला, मित्रांना पाठवले. त्यांना ते पाहून धक्काच बसला. आता हा माझ्यासाठी चिंतेचा विषय झाला आहे.

loading image