esakal | 'प्रेग्नंट आहेस का?' दीपिकाला नेटकऱ्यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

deepika padukone

'प्रेग्नंट आहेस का?' दीपिकाला नेटकऱ्यांचा सवाल

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (deepika padukone) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. काही दिवसांपुर्वी दीपिका निर्माता संजय लिला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर दिसली होती. अभिनेता कार्तिक आर्यन (artik Aaryan) देखील संजय यांच्या ऑफिसबाहेर दिसला होता. दीपिकाने यावेळी केशरी रंगाचा मोठ्या साईझचा स्वेटर आणि निळ्या रंगाची डेनिम घातली होती. दीपिकाचा संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ऑफिसबाहेरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कमेंट करून अनेकांनी 'तू प्रेग्नंट आहेस का?' असा प्रश्न दीपिकाला विचारला आहे. (users ask deepika padukone are you pregnant)

दीपिकाच्या या व्हिडीओला कमेंट करत एका नेटकऱ्याने विचारले की,'तू बेबी बंप लपवण्यासाठी असे मोठ्या आकाराचे कपडे घातले आहेस का?'. तर दुसऱ्याने 'दीपिका तू गरोदर आहेस का?' असा थेट प्रश्न विचारला. काही दिवसांपुर्वी दीपिकाने कैरी खातानाचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी देखील नेटकऱ्यांनी दीपिकाला प्रेग्नंसीवरून प्रश्न विचारले होते. अजून याविषयी दीपिका आणि रणवीरने कोणताही खूलासा केला नाही.

हेही वाचा: 'ती चोर आहे' मृण्मयीचा बहिणीवर आरोप; पहा व्हिडीओ

दीपिका लवकरच '83' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. भारतीय संघाने 25 जून 1983 रोजी लॉर्ड्स मैदानावर विश्वचषक जिंकला होता. यावेळी कर्णधार कपिल देव आणि त्यांच्या टीमने हा विश्वचषक जिंकण्यासाठी केलेली मेहनत तसेच त्यांना आलेल्या अडचणी या सर्व गोष्टींवर या चित्रपटाचे कथानक लिहिले गेले आहे. या चित्रपटामध्ये कपिल देवची भूमिका रणवीर सिंग तर दीपिका कपील देव यांच्या पत्नीची रोमीची भूमिका साकारणार आहे. याशिवाय दीपिका 'पठाण' या चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा: राधिका म्हणाली, 'घरी बसावं लागलं तरी चालेल पण सर्जरी करणार नाही'

loading image