esakal | 66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : हिंदीत 'अंधाधून' तर मराठीत 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
sakal

बोलून बातमी शोधा

Andhadhun

- भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट 
- विकी कौशल, आयुष्मान खुराना सर्वोत्कृष्ट अभिनेते 

66 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : हिंदीत 'अंधाधून' तर मराठीत 'भोंगा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : सहासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज येथे करण्यात आली. "भोंगा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, श्रीराम राघवन दिग्दर्शित व आयुष्मान खुराना- तब्बू अभिनित "अंधाधून' हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. "उरी ः द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटासाठी विकी कौशल याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आयुष्मान खुराना (अंधाधून) याच्यासह मिळाला असून, "पद्मावत'साठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित आणि निर्मित "भोंगा' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. "नाळ' या चित्रपटातील बालकलाकार श्रीनिवास पोफळे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार विभागून जिंकला आहे. "नाळ'साठीच सुधाकर रेड्डी यांना सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. गीतकार स्वानंद किरकिरे यांनी "चुंबक'मधील भूमिकेसाठी यंदा सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरले आहे. पर्यावरण संवर्धनासाठीच्या पुरस्कारासाठी "पाणी' चित्रपटाचे दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांना पुरस्कार मिळला आहे. "नॉन फीचर' गटात "महान हुतात्मा' चित्रपटासाठी सागर पुराणिक यांना संगीत दिग्दर्शनाचा, तर "ज्योती'साठी केदार दिवेकर यांना उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार मिळाला आहे. कौटुंबिक मूल्ये जपणाऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी "आईशपथ'चे दिग्दर्शक गौतम वझे यांना, तर मंगेश हाडवळे यांना याच गटात "चलो जीते है'साठीचा पुरस्कार मिळाला आहे. 

परीक्षक मंडळाचे अध्यक्ष व निर्माते राहुल रवैल तसेच के. एम. कन्नल व उत्पल बोरपजारी यांनी आज 31 प्रकारांतील चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव चैतन्य प्रसाद उपस्थित होते. सर्वाधिक चित्रपटस्नेही राज्याचा पहिला पुरस्कार उत्तराखंडला जाहीर झाला आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार असे ः 
सर्वोत्कृष्ट चित्रपट- अंधाधून 
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर यांना पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी 
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक- संजय लीला भन्साळी (पद्मावत) 
सर्वोत्कृष्ट साउंड डिझायनर- उरी -द सर्जिकल स्ट्राइक 
सर्वोत्कृष्ट ऍक्‍शन चित्रपट- केजीएफ 
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- भोंगा 
पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो (हिंदी) 
सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन (हिंदी) 
पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पाणी (मराठी) 
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक, मराठी) 
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो) 
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजीत सिंग (पद्मावतमधील "बिंते दिल' गाण्यासाठी) 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी..) 
सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष्मान खुराना (अंधाधून) व विकी कौशल (उरी) 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कीर्ती सुरेश (महंती, तेलुगू) 
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख दिग्दर्शक- सुधाकर रेड्डी (नाळ, मराठी) 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी) 
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ, मराठी) 
सर्वोत्कृष्ट संवाद- बंगाली चित्रपट तारीख 
सर्वोत्कृष्ट ऍडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधून 

स्पेशल मेंशन (नॉन फीचर) 
हुतात्मा- सागर पुराणिक 
ग्लो वॉर्म इन ए जंगल- रमण दुंपाल 
लड्डू- समीर साधवानी और किशोर साधवानी 
सर्वोत्कृष्ट नरेशन मधुबनी- द स्टेशन ऑफ कलर 
आवाज- दीपक अग्निहोत्री, उर्विजा उपाध्याय 
सर्वोत्कृष्ट म्यूजिक फिल्म- ज्योती- डायरेक्‍टर केदार दिवेकर 
सर्वोत्कृष्ट ऑडियोग्राफी- चिल्ड्रेन ऑफ द सॉइल- बिश्वदीप चटर्जी 
सर्वोत्कृष्ट लोकेशन साउंड- द सीक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स- अजय बेदी 
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स - अजय बेदी और विजय बेदी 
सर्वोत्कृष्ट बीट डायरेक्‍शन- आईशपथ- गौतम वझे 
सर्वोत्कृष्ट फिल्म ऑन फैमिली वैल्यू- चलो जीते हैं- मंगेश हडवळे 
बेस्ट शॉट फिक्‍शन फिल्म- कासव- आदित्य सुभाष जंभाले 
सोशल जस्टिस फिल्म- व्हाइ मी- हरीश शाह 
सोशल जस्टिस फिल्म- एकांत- नीरज सिंह 
इन्वेस्टिगेटिव फिल्म- अमोली- जैसमिन कौर और अविनाश रॉय 
स्पोर्टस फिल्म- स्वीमिंग थ्रू द डार्कनेस- सुप्रियो सेन 
एज्युकेशनल फिल्म- सरला विरला- एरेगोड़ा 
फिल्म ऑन सोशल इशू- ताला ते कुंजी- शिल्पी गुलाटी 

पर्यावरण संवर्धन चित्रपट - द वर्ल्डस मोस्ट फेमस टाइगर- सुबिया नालामुथु 
सर्वोत्कृष्ट प्रमोशनल फिल्म- रीडिस्कवरिंग जाजम- अविशान मौर्य और कृती गुप्ता 
सर्वोत्कृष्ट साइंसेज अँड टेक्‍नॉलजी फिल्म- जीडी नायडू: द एडिसिन ऑफ इंडिया- रंजीत कुमार 
सर्वोत्कृष्ट आर्टस अँड कल्चरल फिल्म- बुनकर : द लास्ट ऑफ द वाराणसी वीवर्स- सत्यप्रकाश उपाध्याय 
सर्वोत्कृष्ट डेब्यू नॉन-फीचर फिल्म ऑफ ए डायरेक्‍टर- फलूदा- साग्निक चटर्जी 

सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट- सन राइज - विभा बख्शी तसेच द सिक्रेट लाइफ ऑफ फ्रॉग्स - अजय बेदी व विजय बेदी 
सर्वोत्कृष्ट संगीतकार- पद्मावत- संजय लीला भन्साळी 

स्पेशल मेंशन (फीचर) 
नथिकचरामी (कन्नड़)- श्रुती हरिहरन 
कड़क (हिंदी)- चंद्रचूड़ राय (अभिनेता) 
जोसफ (मल्याळम)- जोजू जॉर्ज (अभिनेता) 
सुदानी फ्रॉम नाइजीरिया (मल्याळम)- सावित्री (ऍक्‍ट्रेस) 
राजस्थानी फिल्म- टर्टल- दिनेश एस. यादव 
सर्वोत्कृष्ट पंचिंगा फिल्म- इन द लॅंड ऑफ पॉइजन विमिन- मंजू बोरा 
सर्वोत्कृष्ट शेरडूकपन फिल्म- मिशिंग- बॉबी शर्मा बरुआ 
सर्वोत्कृष्ट गारो फिल्म- मामा- डॉमिनिक संगमा 
सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म- भोंगा- शिवाजी लोटन पाटील 
सर्वोत्कृष्ट तमिल फिल्म- बारम- प्रिया कृष्णस्वामी 
सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म- अंधाधून- श्रीराम राघवन 
सर्वोत्कृष्ट उर्दू फिल्म- हामिद- ऐजाज खान 
सर्वोत्कृष्ट बंगाली फिल्म- एक जे छिलो राजा- सृजीत मुखर्जी 
सर्वोत्कृष्ट मल्याळम फिल्म- सुदानी फ्रॉम नाइजीरिया- जकारिया 
सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- महानती- नाग अश्विन 
सर्वोत्कृष्ट कन्नड़ फिल्म- नाथीचरामी- मंजुनाथ एस (मंसूरे) 
सर्वोत्कृष्ट कोंकणी फिल्म- अमोरी- दिनेश पी. भोसले 
सर्वोत्कृष्ट असामी फिल्मी- बुलबुल कैन सिंग- रीमा दास 
सर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म- हरजीता- विजय कुमार अरोड़ा 
सर्वोत्कृष्ट गुजराती फिल्म- रेवा- राहुल सुरेंद्रभाई भोले, विनीत कुमार अंबुभाई कनोजिया 

सर्वोत्कृष्ट ऍक्‍शन डायरेक्‍टर- कन्नड़ चित्रपट केजीएफ- विक्रम मोरे व अंबू आरिव 
सर्वोत्कृष्ट कोरियॉग्राफी- पद्मावत- कृती महेश माड्या आणि ज्योती तोमर- गीत- घूमर-घूमर 
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्‍ट- तेलुगु फिल्म ऑ- श्रुती क्रिएटिव स्टुडियो 
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्‍ट- कन्नड़ फिल्म केजीएफ- यूनिफाइ मीडिया 
सर्वोत्कृष्ट लिरिक्‍स- कन्नड़ फिल्म नाथिचरामी- 
संगीतकार- मंजुनाथ एस (मंसूर)- गीत - मायावी मानवे 
सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड म्यूजिक- उरी : द सर्जिकल स्ट्राइक- शाश्वत सचदेव 
आर्टिस्ट- तेलुगु फिल्म ऑ- रणजीत 
कॉस्ट्यूम डिजाइनर - तेलुगु फिल्म- महानती- इंद्राक्षी पटनायक, गौरांग शाह आणि अर्चना राव 
प्रॉडक्‍शन डिजाइन - मलायलम फिल्म- कमारा संभावम- बंगाल 
एडिटिंग- कन्नड फिल्म नाथिचरामी- नागेंद्र उज्जयनी 
ऑडियोग्राफी (लोकेशन साउंड रिकॉर्डिस्ट)- मराठी फिल्म तेंडल्या- गौरव वर्मा 
ऑडियोग्राफी (बेस्ट साउंड डिजाइनर)- उरी : द सर्जिकल स्ट्राइक- बिश्वदीप दीपक चटर्जी 
ऑडियोग्राफी (री-रिकॉर्डिस्ट ऑफ द फाइनल मिक्‍स्ड ट्रैक)- तेलुगु फिल्म रंगस्थलम- राजा कृष्णन एमआर 
स्क्रीन प्ले (ओरिजिनल) - तेलुगु फिल्मची अर्जुन ला सो- राहुल रवींद्रन 
स्क्रीन प्ले (अडेप्टेड)- अंधाधून- श्रीराम राघवन, अरिजीत बिश्वास, योगेश चंद्रेकर, हेमंत राव आणि पूजा लाढा सुरती 
स्क्रीन प्ले (डायलॉग)- बंगाली चित्रपट- तारीख- चुरनी गांगुली 
सिनेमॅटोग्राफी- मलायलम फिल्म- उलु- एम. जे. राधाकृष्णन 
पार्श्‍वगायिका- कन्नड़ फिल्म नाथीचरामी- बिंदू मालिनी- गाना- मायवी मनावे 
पार्श्‍वगायक- फिल्म पद्मावत, अरिजीत सिंह- बिंते दिल, पद्मावत. 
बालकलाकार- कन्नड़ फिल्म ओंडाला एराडाला- रोहित 
बाल कलाकार- पंजाबी फिल्म हरजीता- समीप सिंह 
बाल कलाकार- उर्दू फिल्म हामिद- तल्हा अरशद रेशी 
बाल कलाकार- मराठी फिल्म नाल- श्रीनिवास पोकले 
सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री - बधाई हो - सुरेखा सिकरी 
सर्वोत्कृष्ट सहअभिनेता - मराठी फिल्म चुंबक- स्वानंद किरकिरे 


मराठी चित्रपटांतील तरुण दिग्दर्शक, लेखक नवनवीन विषय हाताळत आहेत, नवे प्रयोग करत आहेत, ही अतिशय आश्‍वासक गोष्ट आहे. 
- राजदत्त, ज्येष्ठ दिग्दर्शक, परीक्षक मंडळाचे सदस्य 

loading image