वडिलांच्या आठवणीनं भाग्यश्री भावूक,खास पोस्ट शेअर|Bhagyashree Limaye remembers | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagyashree Limaye

वडिलांच्या आठवणीनं भाग्यश्री भावूक, सोशल मीडियावर खास पोस्ट

Marathi Entertainment: राजेश्वरीच्या पात्रात झळकणारी भाग्यश्री लिमये प्रेक्षकांना जरी मलिकेत कठोर वाटत असली तरी प्रत्यक्ष जीवनात ती अतिशय भाऊक स्वभावाची दिसून (Marathi Actress) येते.मागील वर्षी ७ एप्रिलला भाग्यश्रीच्या वडीलांचे निधन झाले.त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास (Bhagyashree Limaye) सोडला.आज भाग्यश्रीच्या वडीलांना जाऊन एक वर्ष पूर्ण झाले.त्यांच्या आठवणीत भाग्यश्रीने सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट करत अत्यंत भावूक शब्दांत लिहीले की,' तुम्हाला जाऊन एक वर्ष लोटले तरी तुम्ही हयात नसल्याचा विश्वासच बसत नाही.

तिच्या या पोस्टवर सारंग साठ्ये,स्पृहा जोशी,सायली संजीव या कलाकारांनी भाग्यश्रीचे सांत्वन करत पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.भाग्यश्रीने यापूर्वी तिच्या सोशल मीडिया पोस्टमधे वडिलांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक आणि दुःख व्यक्त केले होते. तिच्या आजच्या पोस्ट मधे तिने दु;ख व्यक्त करत,तुम्हाला जाऊन एक वर्ष झाले आणि अजूनही विश्वास बसत नाही! मला तुमची आठवण येते!

हेही वाचा: Viral News: मिकाच्या जिव्हारी लागला तो प्रश्न, पत्रकाराला केली शिवीगाळ

हेही वाचा: Actress Mrunmayee Deshpande Was Angry At Her Sister : मृण्यमयी वैतागली आपल्या लहान बहिणीवर |

हेही वाचा: Viral Video: शाळकरी मुलीच्या गाण्यावर IAS फिदा; पाहा व्हिडिओ

राजेश्वरीच्या भूमिकेमुळे भाग्यश्रीला मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्धी मिळाली आहे.त्यामुळे अनेक कलाकार तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया दर्शवत असतात.तिच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.बॉस माझी लाडाची या मालिकेच्या शिर्षकाप्रमाणे भाग्यश्री चाहत्यांची देखील आवडती झाली आहे.

Web Title: Bhagyashree Limaye Remembers Her Late Father Madhav Limaye On His First Death

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..