
सत्यसाईबाबा लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांचा भक्तगणही मोठा आहे. त्यांच्या देशभरात विविध ठिकाणी आश्रम आहेत.
मुंबई - भारतात धार्मिक गुरुंची काही कमी नाही. जेवढे गुरु आहेत त्यांना फॉलो करणा-या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात आहे, अनेक गुरुंवर गुन्हे दाखल आहेत. ते त्यासाठी तुरुंगात आहेत. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर समाजातील लोकांचे शोषण करुन त्यांची फसवणूक करणा-या काही भोंदू बाबांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. प्रकाश झा यांची आश्रम ही मालिका कमालीची लोकप्रिय झाली आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळाला आहे.
सत्यसाईबाबा लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांचा भक्तगणही मोठा आहे. त्यांच्या देशभरात विविध ठिकाणी आश्रम आहेत. सत्यसाईबाबा यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रसिध्द गायक अनुप जलोटा हे त्यांच्या अनोख्या शैलीतील गायकीसाठी सर्वांच्या पसंतीचे आहेत. ते सोशल मीडिय़ावरही नेहमी सक्रिय असतात. सुत्रांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सत्यसाई बाबांचे ते भक्तही आहेत. त्यामुळे नेहमी सोशल मीडियावर त्यांचे फोटो ते अपलोड करत असतात.
काही दिवसांपूर्वी अनुप यांनी ‘सत्य साईबाबा’ हा चित्रपट साइन केल्याचे सांगितले होते. आता या चित्रपटातील त्यांचा लूक समोर आला आहे. तो कमालीचा व्हायरल होतो आहे. .त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत. जलोटा हे ‘बिग बॉस’च्या बाराव्या सीझनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘सत्य साई बाबा’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हा अनुप यांचा चित्रपटाली लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘माझा हा लूक तुम्हाला कसा वाटला?’ असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे.
'मला आई व्हायचं नव्हतं, मुलंही नको होती'
आगामी काळात येणा-या या चित्रपटाचे दिग्दर्शन विकी राणावत यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. आता अनुप जलोटा यांचा चित्रपटातील लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, गोविंद नामदेव, अरुण बख्शी हे कलाकार देखील भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जाते.