bharati singh with baby
bharati singh with babysakal

बाळाला घेऊन भारती पहिल्यांदाच कॅमेऱ्यापुढे... आला सुंदर व्हिडिओ समोर

भारती सिंग, हर्ष लांबाचिया आणि त्यांच्या बाळाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी जाताना दिसत आहे. या व्हिडीओत ती काय म्हणाली पाहा..
Published on

Tv Entertainment News: टिव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये लोकप्रिय असणाऱया अभिनेत्री भारती सिंगने (Bharti Singh) काही दिवसांपूर्वीच गुड न्युज देत ती आई झाल्याचे सांगितले. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. तिच्या या आनंदात चाहतेही सहभागी झाले असून ते शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत. भारती बाळाला घेऊन कधी एकदा रुग्णालयाबाहेर येईल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. तो दिवस अखेर आज आला.

भारती सिंग प्रेग्ननसीच्या काळातही काम करत होती. अगदी प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत ती कामात व्यग्र होती. या दरम्यान तीने प्रेग्ननसीशी निगडीत वेगवेगळे व्हिडिओ करुन चाहत्यांचे मनोरंजन केले. तिच्या मेहनती वृत्तीचे विशेष कौतुक केले गेले. तर मॅटर्निटी काळातील तिचा फोटोशुटही चाहत्यांना विशेष भावला. तिच भारती सिंग आता आई होऊन कॅमेऱ्यापुढे आली.

bharati singh with baby
Photo story : हे लाल चुटुक गुलाब आहे की सई ताम्हणकर... केलं खास फोटोशूट

भारती, हर्ष (harsh lambachiyaa) आणि त्यांच्या बाळाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी जाताना दिसत आहे. भारतीसोबत तिचा पती हर्ष त्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन उभा आहे. हा व्हिडीओ हॉस्पिटल बाहेरचा असून भारती आनंदात दिसत असून तिच्या चेहऱ्यावर थोडासा थकवादेखील जाणवत आहे.

या व्हिडीओमध्ये भारतीच्या बाळाचा चेहरा दिसत नसला तरी येत्या काळात लवकरच भारती बाळाचा चेहरा दाखवेल आणि याविषयी भाष्य करेल असेही तिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. सध्या बाळाच्या जन्मामुळे भारतीने 'हुनरबाज' शोमधून ब्रेक घेतला असून तिच्या जागी अभिनेत्री सुरभी चंदना सूत्रसंचालन करणार असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com