Bhargavi Chirmule shared post for actress priyadarshini indalkar phulrani movie
Bhargavi Chirmule shared post for actress priyadarshini indalkar phulrani movie sakal

काही माणसं आपल्याला भेटतात ती आपली होऊन जातात.. 'या' व्यक्तीसाठी भार्गवी चिरमुलेची खास पोस्ट..

अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या पोस्टनं वेधलं लक्ष..

Bhargavi Chirmule: मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले. गेली अनेकवर्ष ती मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत असून तिने अनेक मालिका, चित्रपट, नाटक केलं आहे. तिच्या अभिनयाचे अनेक चाहते दिवाने आहेत.

या शिवाय भार्गवीच्या नृत्याची जादूही आपण वेगवेगळ्या रिएलिटी शो मधून अनुभवली. लावणी आणि भार्गवी हे देखील एक वेगळेच समीकरण आहे. नुकतेच तिचे 'येतोय तो खातोय' हे नाटक आले आहे.

भार्गवी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेक विषयांवर ती बोलत असते. पण आज मात्र ती एका खास व्यक्तीविषयी बोलली आहे. काही माणसं आपल्याला भेटतात ती आपली होऊन जातात.. अशा आशयाची पोस्ट भार्गवीने केली आहे.

(Bhargavi Chirmule shared post for actress priyadarshini indalkar phulrani movie)

Bhargavi Chirmule shared post for actress priyadarshini indalkar phulrani movie
Prakash Raj Birthday: ३०० रुपये मानधनावर काम करायचे प्रकाश राज, आडनाव बदलंल आणि आज कमावतयात..

भार्गवी म्हणते, '' काही माणसें आपल्याला भेटतात ती आपली होऊन जातात ....पुढे जाऊन ती माणसे वेगळ्या वाटेला जातात तरी त्याचाशी ते बंध तसेच राहतात ... त्यांची प्रगती त्याचं यश त्यांची मेहनत पाहून आपल्याला कायम आनंद आणि अभिमान वाटत राहतो आणि मग ते कायमचे ऋणानुबंध होऊन जातात..''

पुढे ती म्हणते, ''तशीच आहे माझी लाडकी प्रियदर्शिनी इंदलकर.. तिचा 'फुलराणी' हा पहिला सिनेमा प्रदर्शित झालाय,, त्या निमित्ताने तिला खूप साऱ्या शुभेच्छा..''

भाग्यश्रीने ही पोस्ट अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर साठी लिहिली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी आता 'फुलराणी' चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात सुबोध भावे आणि प्रिया यांची केमिस्ट्री दाखवण्यात आलेली आहे. एका अजरामर नाटकावर आधारित असलेल्या या सिनेमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे प्रियदर्शिनीचे देखील खूप कौतुक केले जात आहे.

विशेष म्हणजे, प्रियदर्शिनी आणि भार्गवी चिरमुले यांच्यात एक वेगळे नाते आहे. नुकतेच एका मुलाखतीत प्रियदर्शिनी म्हणाली की, 'जेव्हा मी मुंबईत कामासाठी आले तेव्हा माझ्याकडे घर नव्हतं त्यावेळी भार्गवी ताईने मला तिच्या घरी राहायला जागा दिली. एवढच नाही तर तिने आई होऊन माझी काळजी घेतली.'

त्यामुळे आपल्याकडे राहायला आलेली मुलगी आज मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत असल्याचं आनंद भार्गवीने आपल्या पोस्ट मधून व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com